शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील ‘जाणवस’ घर ग्रामीण भागातून हद्दपार, खेड्यापाड्यातही कार्यालयामधील लग्नाची क्रेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:40 IST

बाबासाहेब परीट बिळाशी : ‘जानवसा घर’ हा शब्द ग्रामीण भागात प्रचलित होता. पूर्वी गावगाड्यातील लग्नांमध्ये जानवस घर हे नवरी ...

बाबासाहेब परीटबिळाशी : ‘जानवसा घर’ हा शब्द ग्रामीण भागात प्रचलित होता. पूर्वी गावगाड्यातील लग्नांमध्ये जानवस घर हे नवरी मुलगी उतरण्याचे हक्काचे आणि महत्त्वाचे ठिकाण होते. आधुनिकीकरणाच्या रेट्यामध्ये कार्यालयातील लग्नांमुळे जानवस घर हा शब्द आणि घरही हद्दपार होत आहे.ग्रामीण भागात पूर्वी पाच दिवसाची लग्न होत असत. ती नंतरच्या काळामध्ये तीन दिवसांवर आली. नवरी मुलगी आणि वऱ्हाड आदल्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी मुक्कामाला येत असे. नवरी मुलगी आणण्यासाठी बैलगाड्या सजवल्या जात होत्या. जुन्या घातलेल्या बैल आणि सजवलेल्या बैलगाड्यातून आलेल्या नवरी मुलगीचे स्वागत जंगी होत असे. गावातील वेशीवर पै-पाहुण्यांच्या भेटीगाठी होत असत. त्यानंतर नवरी मुलगीला जानवस घरी घेऊन जात असत.जानवस घरी मुलगीला तयार होण्यासाठी सुरक्षित जागा होती. तिथे त्यांच्या राहण्याची जेवणाची व तयार होण्याची गडबड चाले. वरमाई जानवस घराची मुख्य असायची. तिच्या ताब्यात त्या दिवशीचे किमती दस्तऐवज, आहेर याबाबतची सगळी जबाबदारी असे. अलीकडे यादी पे शादी पद्धतीने तातडीने लग्न ठरत आहेत व भावकी लग्नात कुरघड्या करतील, यामुळे बहुतांशी विवाह कार्य जवळच्या कार्यालयातच होत आहेत.कार्यालयातच वधू पक्ष - वर पक्ष यांच्या खोल्या असल्यामुळे जानवस घर हा शब्द आणि घरही प्रचलित परंपरेतून हद्दपार होत आहे. कितीही आधुनिकरणाचा रेटा आला तरी आजही ग्रामीण भागात एखाद्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधायचा असेल तरीही लोक सांगतात आमक्या तमक्याचे ते जानवस घर आहे.कालानुरूप बदलजुना पिढीतील अण्णा परीट म्हणाले, पूर्वी लग्नसोहळा थाटामाटात असायचा. लग्नामध्ये सर्व भावकी एका जिवाने असायची, सर्वजण झटायचे. परंतु कालानुरूप त्यामध्ये बदल झाले, सध्या लोकांना वेळ कमी आहे आणि लोकांकडे आर्थिक ताकद आल्यामुळे हे बदल होत राहतील. परंतु जानवस घर हा शब्द मात्र कायमस्वरूपी जुन्या पिढीच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न