शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

Sangli- गुंठेवारी नियमितीकरण संपणार तरी कधी?; वीस वर्षांपासून भिजत घोंगडे, नव्या प्रश्नांचे आव्हान

By शीतल पाटील | Updated: April 10, 2023 17:20 IST

शासनाने २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा नियमितकरणाचे घोंगडे आणखी काही वर्षे भिजतच पडणार

शीतल पाटीलसांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रश्न कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही. नियमितीकरणावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यात गुंठेवारीत दरवर्षी नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. शासनाने २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा नियमितकरणाचे घोंगडे आणखी काही वर्षे भिजतच पडणार आहे.सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये १९८५ ला शेतजमिनीची तुकडे पद्धतीने म्हणजेच गुंठेवारी पद्धतीने प्लॉट पाडून विक्री करण्यास प्रारंभ झाला. ज्यांना बिगर शेती झालेले प्लॉट खरेदी करून घर बांधणे शक्य नाही अशांनी गुंठा, दोन गुंठा जमीन खरेदी करून आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार केले. सामान्य लोक, नोकरदारच नव्हे तर बड्या लोकांनीही येथे जागा खरेदी करून इमले उभे केले. ७० टक्के वसाहती हा गुंठेवारीत वसल्या आहेत. अनेक नगरे आणि उपनगरे निर्माण झाली आहेत. शासनाने ग्रीन झोनमुळे सुविधा देण्यास मनाई केली होती. त्यामुळे गुंठेवारी कायदा करण्याची मागणी पुढे आली.

सन २००१ ला शासनाने गुंठेवारी कायदा केला. शुल्क आकारणी करून नियमितीकरण करण्याचे अधिकार महापालिकेला दिले. सुरुवातीला याला प्रतिसाद मिळाला. त्यात २००५ साली महापुराचा तडाखा बसल्याने नियमितीकरणाचे निकषच बदलून गेले. अनेक घरांचा पूरपट्ट्यात समावेश झाला. नवी पूररेषा निश्चित झाली. महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागेवरील गुंठेवारीचा प्रश्नही कायम आहे.

आरक्षण आणि पूरपट्ट्यातील घरे नियमित करता येणार नाहीत. तरीही प्रस्ताव दाखल होत आहे. गुंठेवारीतील काही कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टुपणामुळे अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या साऱ्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहून नागरिकांना न्याय देण्याची भूमिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

प्लाॅट मोजणीचा नवा प्रश्नशासनाने गुंठेवारी क्षेत्राची मोजणी करून नकाशे तयार करण्याच्या सूचना २००३ साली दिल्या होत्या. तेव्हा प्रत्येक प्लाॅटसाठी ५०० रुपये दर निश्चित केला होता. याकडे नागरिकांसह महापालिकेनेही दुर्लक्ष केले. आता तहसीलदारांनी मोजणीच्या नोटीस दिल्या आहेत. पण, मोजणीचे दर वाढले असून, एका प्लाॅटसाठी बारा हजाराचा खर्च होणार आहे. त्यासाठी नव्याने लढा सुरू झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगली