सांगली : जिल्ह्यात थंडीचा जोर वाढून तापमान १० ते ९ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. उत्तरेकडे थंडीची लाट असून, तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह जिल्हा सुद्धा गारठला आहे. वाढलेल्या थंडीमुळे पहाटे व रस्त्यांवर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. अनेक लोक स्वेटर, कानटोपी, हातमोजे अशा लवाजम्यासह बाहेर पडताना दिसत आहेत. ही थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने त्याचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहेत. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी सक्रिय झाली आहे. हवामान विभागाने राज्यात १० व ११ डिसेंबरला यलो अलर्ट दिला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात सरासरी तापमान किमान तापमान ९ ते १२ अंशांपर्यंत राहणार आहे. या शीतलाटेमुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.तापमानातील बदल, थंडीचा कडाका आणि हवेतील प्रदूषण यामुळे ताप, सर्दी, खोकला व घशातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीमुळे पहाटे व सकाळी धुके पसरत आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. सकाळी विद्यार्थ्यांना कुडकुडत शाळा गाठावी लागत आहे. रस्त्यावर उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
गत व पुढील आठवड्यातील तापमानदिनांक / किमान / कमाल११ डिसेंबर / ९ / ३११२ डिसेंबर / १० / ३०१३ डिसेंबर /१२ / ३०१४ डिसेंबर /१३ / ३११५ डिसेंबर / १३ / ३१
Web Summary : Sangli shivers as temperatures plummet, triggering bonfires. A cold wave from the north has swept through the region, prompting a yellow alert. People are advised to take precautions as the cold weather is expected to persist for a week, causing health issues and affecting daily routines.
Web Summary : सांगली में तापमान गिरने से ठंड बढ़ी, अलाव जले। उत्तरी हवाओं से शीतलहर आई है, जिसके कारण येलो अलर्ट जारी किया गया है। मौसम विभाग ने लोगों को सावधानी बरतने की सलाह दी है। ठंड एक सप्ताह तक रहने की संभावना है, जिससे स्वास्थ्य समस्याएं और दैनिक जीवन प्रभावित हो रहा है।