शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेतील ऐतिहासिक वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार, कामगारांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:26 IST

रुग्णालयातील कामगारांचे सुमारे २५ कोटी थकीत वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात येणार

मिरज : मिरजेतील बंद पडलेल्या ऐतिहासिक वॉन्लेस हॉस्पिटलचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पक्षाचे नेते विनोद निकाळजे यांच्या नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट संस्थेकडे हस्तांतरण होणार आहे. वॉन्लेस हॉस्पिटल चालविण्यासाठी लवकरच सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे वॉन्लेस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.वैद्यकीय पंढरी अशी ओळख असलेल्या मिरजेतील वैद्यकीय व्यवसायाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मिरजेतील सुमारे १३० वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेले ऐतिहासिक वॉन्लेस रुग्णालय गेली तीन वर्षे आर्थिक अडचणीमुळे बंद आहे. अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये मिरजेत वॉन्लेस (मिशन) रुग्णालयाची स्थापना करून आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा प्रारंभ केला.

डॉ. वॉन्लेस यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले. १९६२ मध्ये मिशन रुग्णालयाच्या सहकार्याने मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवर लोक मिरजेला उपचारासाठी येत असल्याने मिशनचा राज्यात व देशातही लौकिक होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या ऐतिहासिक मिशन हॉस्पिटलचे अस्तित्व धोक्यात आहे. रुग्णालयातील चारशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीवर आहे. पगार नसल्याने रुग्णालय कर्मचारी हवालदिल आहेत.

खासगी संस्थेचा पुढाकारथकबाकीमुळे रुग्णालयाचा वीज व पाणीपुरवठाही खंडित केला होता. या पार्श्वभूमीवर विनोद निकाळजे यांच्या खासगी संस्थेने हॉस्पिटल चालवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या संस्थेकडे वॉन्लेस रुग्णालयाच्या हस्तांतरणासाठी बैठक पार पडली आहे.

कामगारांना दिलासामिशन हॉस्पिटल नवीन व्यवस्थापनाखाली सुरू होणार असल्याने येथील कामगारांना दिलासा मिळाला आहे. रुग्णालयातील कामगारांचे सुमारे २५ कोटी थकीत वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. दोन आठवड्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रुग्णालयाची पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती ‘रिपाइं’चे नानासाहेब वाघमारे यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजhospitalहॉस्पिटल