शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या आंदोलनाकडे शासनाने फिरविली पाठ, मुंबईत १५० दिवसांपासून संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 16:50 IST

अनुदानासाठी धरणे आंदोलन 

दिलीप मोहिते विटा (सांगली) : राज्यातील विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकतेर कर्मचारी संघटनेच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर २१ फेब्रुवारी २०२३ पासून अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु, या आंदोलनाला तब्बल १५० दिवस उलटून गेले तरी या प्रश्नांची शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. शासनाने या आंदोलनाकडे सोयीस्कररित्या पाठ फिरविल्याने आंदोलकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारा शिक्षक  मुख्य घटक आहे. या शिक्षकांना घडविणाºया शिक्षणशास्त्र महाविद्यालयासाठी राज्य शासनाने सन २००१ पासून विनाअनुदानित धोरण स्विकारले. या धोरणानुसार त्यापूर्वी स्थापन झालेली सर्व महाविद्यालये ही अनुदानास पात्र असतानाही शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अद्यापही शासनामार्फत कोणत्याही प्रकारचे अनुदान दिलेले नाही. परिणामी, शासनाने शिक्षणशास्त्र विद्याशाखा दुर्लक्षित ठेवल्याची बाब गंभीर आहे.मागील वर्षी सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या तपासण्या होऊन संचालक कार्यालयाव्दारे अहवाल मंत्रालय, शिक्षण विभाग येथे पोहचलेले आहेत. परंतु, पुढील कार्यवाही रखडलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून व सद्यस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना वारंवार भेटून निवेदनेही दिली आहेत. तरीही या प्रश्नांवर शासन स्ततावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अनुदान मिळावे या मागणीसाठी दि. २१ फेबुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकतेर कर्मचारी संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु, या आंदोलनाला तब्बल १५० दिवस पूर्ण झाले तरी याकडे शासनाने जाणीवपूर्वक पाठ फिरविली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अनुदान मंजुर करावे, अशी मागणी होत आहे.८९ शिक्षणशास्त्र महाविद्यालये राज्यात सन २००१ पूर्वीची ८९ शिक्षणशास्त्र महाविद्यालये आहेत. शासनाने या सर्व महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. एका बाजूला शासन आपल्या दारी उपक्रम सरकार राबवित आहे. परंतु, आम्ही आंदोलनकर्ते आझाद मैदानावर गेल्या १५० दिवसापासून शासनाच्या दारी बसुनसुध्दा साधी विचारपूसही शासनाकडून केली जात नसल्याचे संघटनेच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. मेघाताई गुळवणी यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीagitationआंदोलनMumbaiमुंबई