शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगावात वाहून गेलेले दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील, सलग दुसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:02 IST

आईच्या अंत्यविधीनंतरचे सर्व विधी करून माघारी जाताना घडली दुर्घटना 

तासगाव : तासगाव हद्दीत येरळा नदीच्या पुलावरून सोमवारी दुपारी वाहून गेलेले जोडपे सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक  (ता. कोरेगाव) गावचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आईचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी रेखा दत्तात्रय पवार (वय ४४)  या पती दत्तात्रय उत्तम पवार (५२) यांच्यासोबत शनिवारी तासगावला आल्या होत्या. अंत्यविधीनंतरचे सर्व विधी करून माघारी पिंपोडे बुद्रुकला जात असताना येरळा नदीच्या पुलावरून वाहून गेले. एनडीआरपीच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू होती. मात्र अद्याप तपास लागला नाही.सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथील रेखा पवार यांचे तासगाव येथे आई-वडील वास्तव्यास होते. आईचा मृत्यू झाल्यानंतर रेखा पवार पती दत्तात्रय पवार यांच्या सोबत शनिवारी तासगावला आल्या होत्या. अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधी झाल्यानंतर सोमवारी दोघे पती-पत्नी पिंपोडे बुद्रुकला निघाले होते. जुना सातारा रस्त्यावर तासगाव ते तुरचीच्या दरम्यान असलेल्या येरळा नदीवरील पुलावर गेल्या काही दिवसांपासून पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.मात्र त्या ठिकाणाहून  सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पवार दाम्पत्य तुरचीच्या दिशेने निघाले होते. तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जाऊ नका, अशी विनंती केली होती. मात्र तरीही दुचाकीवरून हे दांपत्य पुलावर गेले. पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्यामुळे, तोल जाऊन दुचाकीसह दोघेही नदीच्या प्रवाहात कोसळले. त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली एनडीआरएफच्या पथकाला पाचरण केले. काल रात्री उशिरापर्यंत पथकाकडून शोध मोहीम सुरू होती. मात्र तपास लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या पथकाकडून शोधमोहीम राबवण्यात आली. दिवसभर शोधमोहीम सुरू होती. तरीही तपास लागू शकला नाही. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह पवार दांपत्याच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

आईच्या रक्षाविसर्जना दिवशीच लेक-जावयाची दुर्घटना रेखा पवार यांच्या आईचे सोमवारी रक्षाविसर्जनसह सर्व अंत्यसंस्कारानंतरचे विधी पार पडले. त्यानंतर लेक आणि जावई स्वतःच्या गावी निघाले. मात्र गावी निघाले असतानाच त्यांच्या बाबतीत दुर्घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.तासगाव पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद सोमवारी गावाकडे येण्यासाठी निघालेले आई-वडील रात्री उशिरापर्यंत गावी न आल्याने आणि त्यांचा मोबाईल लागत नसल्याने, पवार दांपत्याचा मुलगा योगेश दत्तात्रय पवार यांनी आई-वडील बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणे