शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकारी ऑगस्टपासून वेतनाविना, निधीचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:37 IST

सांगली : जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियुक्तीस असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतर आणि ...

सांगली : जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियुक्तीस असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतर आणि पुरवणी मागण्या मंजूर होण्यास झालेला विलंब यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.जिल्ह्यातील सुमारे ६५ हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी ऑगस्टपूर्वीपासून, तर काही ठिकाणी ऑक्टोबरपासून त्यांच्या नियुक्त्या आहेत. या सर्वांनाच वेतनासाठी पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे.प्रत्येक केंद्रात एक मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्यासोबत सहायक म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे. एमबीबीएस पदवीधर असलेल्या कंत्राटी अधिकाऱ्यांना मासिक ७५ हजार रुपये मानधन आहे, तर बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४० हजार रुपये मानधन दिले जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही आर्थिक लाभ मिळत नाहीत. पण हे मानधन ऑगस्टपासून मिळालेले नाही.यातील काही वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्यापासूनच मानधनापासून वंचित आहेत. नोकरीस लागल्यापासून त्यांना एकदाही मानधन मिळालेले नाही.दरम्यान, केंद्रांतील कंत्राटी कर्मचारीही वेतनापासून वंचित आहेत. चिकुर्डे, बिळाशी, मुचंडी या केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी काही दिवस काम बंद आंदोलनही केले, पण मानधन पदरात पडू शकले नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, लिपिक, स्त्री व पुरुष परिचर अशा विविध पदांवर कंत्राटी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागज, वांगी, लेंगरे, नागज, चिकुर्डे, वाटेगाव, देवराष्ट्रे येथील कर्मचाऱ्यांचे मानधन विस्कळीत आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वेळेत उपलब्ध झाला नाही. जसजसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार पगाराची बिले कोषागार कार्यालयाकडे पाठविली आहेत. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पगारबिले नुकतीच कोषागारात पाठविली आहेत. विधिमंडळात पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर निधी येऊ लागला आहे. मानधन लवकरच खात्यावर जमा होईल. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर