शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

घरटे कमकुवत झाल्याने पिल्लू जमिनीवर पडले, सांगलीतील पक्षी मित्रांमुळे घारीची पिल्लांसोबत झाली पुनर्भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:57 IST

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर भेट यशस्वी

सांगली : येथील एसटी कॉलनीतील पतंगे यांच्या घराच्या अंगणात मंगळवारी पक्ष्याचे पिल्लू आढळून आले. जमिनीवरच्या पिल्लाची आणि मादी घारीची पुनर्भेट घडवून आणण्याची कामगिरी सांगलीतील पक्षी मित्रांनी तीन तासांच्या प्रयत्नाने यशस्वी पार पाडली.पिल्लू नेमके कोणत्या पक्षाचे आहे, हेच कळत नव्हते. पतंगे यांनी पक्षी मित्र मेहत्रस व मानद वन्य जीव संरक्षक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाहणी करून हे पिल्लू घारीचेच असल्याचा निष्कर्ष काढला. यादरम्यान, उंच वाढलेल्या नारळाच्या झाडाभोवती घारीच्या घिरट्या सुरू होत्या. नारळाच्या झाडावर असलेल्या घरट्यात मादी इतर पिल्लांसोबत असल्याचे आढळले. एक पिल्लू तिच्यासोबत, तर दुसरे माणसाच्या गराड्यात अडकलेले. मादी घार उंच आकाशी झेप घ्यायची आणि काही क्षणात परत घरट्याकडे परत यायची, असे बराच काळ सुरू होते, तरीही पक्षीप्रेमींनी धाडस करून उंच झाडावर चढून पाहिले असता, घरटे नाजूक झाल्याने पिल्लू जमिनीवर पडल्याचे दिसून आले. पक्षी मित्रांनी जमिनीवर पडलेले पिल्लू परत घरट्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन्ही पिले व्यवस्थित राहू शकतील एवढे घरटे मजबूत नव्हते. यावर पर्याय म्हणून बांबूच्या टोपलीत पिल्ले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय झाला. मारुती बंडगर यांनी पिलू घरट्यात सुखरूप ठेवल्यामुळे अथक प्रयत्नानंतर मादी घारीची आपल्या दोन पिल्लांशी पुनर्भेट झाली. यावेळी खोपा बर्डचे सचिन शिनगारे, ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ, बर्ड साँग संस्थेचे सदस्य पाटील व मेहत्रस आदींनी आई व पिल्लाची पुनर्भेट घडवून आणण्यात मोलाची कामगिरी केली.

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर भेट यशस्वीबांबूच्या टोपलीत पिल्ले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उंच नारळाच्या झाडावर चढून पिले सुरक्षित पोहच करणे आणि हे करत असताना घारीकडून हल्ल्याची भीती होतीच. शहरातील उंच झाडावर चढण्याची सवय असलेल्या मारुती बंडगर यांना पक्षी मित्रांनी बोलवले. त्यांनी हेल्मेट घालून ही किमया साधली आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मादी घारीची आपल्या दोन पिल्लांशी पुनर्भेट झाली.

टॅग्स :Sangliसांगली