शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Sangli: मोडणारा संसार पुन्हा लोकअदालतीत उभा राहिला, मुलांना पुन्हा मिळाली आई-वडिलांची छत्र छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:54 IST

विकास शहा शिराळा : शिराळा येथे पार पडलेल्या लोक न्यायालयात एक संसार पुन्हा उभा राहिला तर या मुलांना आई ...

विकास शहा

शिराळा : शिराळा येथे पार पडलेल्या लोक न्यायालयात एक संसार पुन्हा उभा राहिला तर या मुलांना आई वडिलांची छत्र छाया पुन्हा मिळाली आहे. याचबरोबर ९५ प्रलंबित प्रकरणे तसेच ३०० वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ३९५ प्रकरणे मिटवण्यात आली यातून ६२ लाख ३९ हजार २६६ रुपये वसूल करण्यात आले.रेश्मा कदम (रा.सुपणे, ता. कराड , जि. सातारा) यांचा शरद कदम ( रा.भटवाडी , ता.शिराळा ) यांच्याशी विवाह झाला होता मात्र कौटुंबिक वादातून २०२१ पासून शिराळा येथील न्यायालयात खटला सुरू होता. त्यांना एक मुलगाही आहे. आज शनिवारी पार पडलेल्या लोक न्यायालयात हा वाद संपुष्टात येऊन रेश्मा या पुन्हा नांदण्यासाठी तयार झाल्या. यामुळे एक संसार पुन्हा उभा राहिला तसेच मुलाला आपले आई वडिलांची छत्र छाया ही मिळाली.हा वाद मिटल्यावर न्यायाधीश एस एस सुरजुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.यावेळी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या तोंडावर समाधानाचे हास्य पसरले होते. यावेळी न्यायाधीश एस एस सुरजुसे, न्यायाधीश विनया देसाई, ए एस घाटगे, ऍड जी एल पाटील, ऍड सुधीर पाटील, ऍड पी बी थोरात, आरती पाटील आदी उपस्थित होते.या लोक न्यायालयात १ हजार १२६ प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ८८४  वादपूर्व प्रकरणे असे एकूण ३ हजार १० प्रकरणे  ठेवण्यात आली होती. यापैकी ९५ प्रलंबित प्रकरणे तसेच ३०० वादपूर्व प्रकरणे अशी एकूण ३९५ प्रकरणे मिटवण्यात आली. यातून ६२ लाख ३९ हजार २२६६ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय