शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

‘जुनं ते सोनं’! बैलगाडीतून नववधू आली, जुनी विवाह परंपरा जपली; सांगलीतील लग्नसोहळा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 12:47 IST

अलिकडे अलिशान गाड्या, रथ, डोली तर कधी हेलिकॉप्टरमधून वधू-वरांना मंडपात आणले जाते. मात्र, या परंपरेला आय. टी. कंपनीत नोकरीस असलेल्या सांगलीतील नववधूने छेद दिला

विकास शहा शिराळा : हौसेला मोल नसते म्हणून लग्नकार्याला मौल्यवान बनविण्याची प्रथा सर्वत्र सुरु झाली आहे. कधी अलिशान गाड्या, कधी रथ, डोली तर कधी हेलिकॉप्टरमधून आकाशभरारी घेत वधू-वरांना मंडपात आणले जाते. मात्र, या परंपरेला छेद देत ‘जुनं ते सोनं’ असा संदेश समाजाला देत अंत्री खुर्दला अनोखा विवाह सोहळा रंगला. बैलगाडीतून वधू-वरांना मंडपात आणत लेझीमच्या तालात पार पडलेला हा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द (ता. शिराळा) येथील अक्षता चव्हाण व प्रशांत  पाटील यांचा विवाह थाटामाटात झाला. अक्षता ही एम.बी.ए असून पुणे येथे आय. टी. कंपनीत नोकरीस आहे. तिचे  वडील अशोक चव्हाण हे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आहेत. प्रशांतचे मुंबई येथे महा ई-सेवा केंद्र  असून त्याचे  वडील आनंदा पाटील हे  शेतकरी आहे.

वधू-वर हे उच्च शिक्षित असतानाही ग्रामदेवताचे दर्शन बैलगाडीतून जाऊन  घेतले. नंतर वधू-वर  वऱ्हाडी मंडळींसह लग्नस्थळी बैलगाड्यांतून रवाना झाले. वाद्य म्हणून पारंपरिक  लेझीमचा वापर  केला. त्यामुळे लेझीम व  बैलगाडीची एन्ट्री हेच सर्वांचे  आकर्षण ठरले.बैलगाडीचे सजणेही जुन्याच पद्धतीचेपूर्वी वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे नववधूसह वऱ्हाडी मंडळी ही बैलगाडीतून जात. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी बैलगाडी होती. एका गाडीत सात-आठ  लोक सहज बसत असत. ज्या गाडीत नववधू असायची त्या गाडीला घोंगड्या कमान करून त्यास फुगे बांधून व बैलांच्या शिंगांना सजवून त्यांच्या अंगावर झुला घालून गाडी आकर्षकपणे सजवलेली असायची. अगदी असाच काहीसा अनुभव या सोहळ्यात घेण्यात आला.विवाह सोहळ्याचे तालुक्यात कौतुकअंत्री खुर्द येथील या साध्या पद्धतीच्या पण तितक्याच शानदार विवाह सोहळ्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. हे पाऊल उचलणाऱ्या चव्हाण व पाटील कुटुंबियांचेही कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्न