शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

Sangli: खून झालेल्या तरुणाचा मृतदेह स्मशानातून संशयितांच्या दारात, विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:19 IST

अंकली येथे तणाव, कडकडीत बंद : संशयितांची धिंड काढण्याची मागणी

सांगली : अंकली (ता. मिरज) तरुणाच्या खूनप्रकरणी संशयितांवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार थांबवून ठेवले. मृतदेह संशयितांच्या घरासमोर नेऊन ठेवला. यामुळे गावात मंगळवारी सकाळपासून तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. दुपारनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंकलीमध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत बाचाबाची होऊन शीतल धनपाल पाटील (वय २५) तरुणाला भोसकण्यात आले होते. त्याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी गावात आणण्यात आला. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयितांवर तातडीने कारवाईचा आग्रह कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी धरला.अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा गावात आणला. संशयितांच्या घरासमोर ठेवला. संशयितांची गावातून धिंड काढण्याची मागणी लावून धरली. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे गावात दुपारपर्यंत तणावाचे वातावरण होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी याची माहिती वरिष्ठांना दिली.खुनाच्या निषेधार्थ व संशयितांवर कडक कारवाईसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले. ग्रामस्थांनी सांगितले की, गावाच्या बदनामीस कारणीभूत ठरणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. संतप्त ग्रामस्थांची भूमिका पाहून सांगली ग्रामीण पोलिसांनी गावात बंदोबस्तात वाढ केली. निरीक्षक किरण चौगुले यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जैन मंदिराजवळ गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. त्यावेळी संशयित विकास बंडू घळगे (वय ३५, रा. अंकली) हा मिरवणुकीत नाचू लागला. तेव्हा मंडळाचे कार्यकर्ते सुनील पाटील यांनी त्याला अडवले. ‘तू आमच्या मंडळाच्या मिरवणुकीत नाचू नकोस,’ असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या घळगे याने सुनील पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. पाटील यांचा पुतण्या शीतल भांडण सोडविण्यास गेला.त्यावेळी घळगे याचे मित्र क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (वय २८), आदित्य शंकर घळगे (वय २२, सर्व रा. अंकली) हे तेथे आले. त्यांनीही सुनील पाटील यांना मारहाण सुरू केली, तर शीतलला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. नातेवाईक व ग्रामस्थांनी शीतलला सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. शीतलचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी मृतदेह गावात आणताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सारे गावकरी गोळा झाले. मृतदेह स्मशनभूमीत नेण्यात आला, मात्र तेथे गोंधळाला सुरुवात झाली. संशयितांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी सुरू केली. त्यामुळे मृतदेह पुन्हा गावात आणण्यात आला. संशयितांच्या घरासमोर ठेवला.

दहशत मोडून काढण्याची मागणीगावातील तणावाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण चौगले फौजफाट्यासह गावात आले. त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी कारवाईसाठी आग्रह धरला. गावातील दहशत मोडून काढा, संशयितांची धिंड काढा, कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. चौगुले यांनी कडक कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. मृत शीतल पाटील याला न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाच्या निषेधार्थ बंद पाळल्याने गावात दिवसभर सर्व व्यवहार बंद राहिले.

गावात विविध समाजातील लोक एकोप्याने राहत आहेत. पण, काही मोजक्या समाजकंटकांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निषेधार्ह आहे. संशयितांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. - शशिकांत पाटील, माजी सरपंच, अंकली 

संशयितांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी, यादृष्टीने तपास केला जाईल. गावात सध्या शांततेचे वातावरण आहे. - किरण चौगले, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे