शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: परीक्षा शुल्कासाठी बोर्डाने अडविला निकाल, मिरजेतील ३५८ विद्यार्थ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:51 IST

चूक लिपिकाची शिक्षा विद्यार्थ्यांना : आयुक्तांच्या आदेशानंतर लिपिक निलंबित

मिरज : महापालिकेच्या मिरज हायस्कूलमधील कनिष्ठ लिपिक देवेश लक्ष्मण नलवडे याने २५ हजार रुपये परीक्षा शुल्काचा अपहार केल्याप्रकरणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यास बुधवारी निलंबित केले. देवेश नलवडे यांच्या विरुद्ध शहर पोलिसांतही तक्रार देण्यात आली आहे. मात्र, परीक्षा शुल्क मिळाले नसल्याने बोर्डाने ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल अडविला आहे.मिरज हायस्कूलमध्ये राज्य कला संचालनालयातर्फे ४ ते ६ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मिरज शहर व तालुक्यातील २६ शाळेतील ६९५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. नववी व दहावीचे विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचे ७ गुण दहावी बोर्ड परीक्षेत दिले जातात. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे शुल्क आपापल्या शाळेत जमा केले होते. मिरज हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र असल्याने सर्व शाळांनी हे परीक्षा शुल्क मिरज हायस्कूलमध्ये जमा केले होते.दरम्यान, ६९५ विद्यार्थ्यांपैकी ११ शाळेतील ३५८ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ७० रुपयांप्रमाणे एकूण २५ हजार ६० रुपये ही रक्कम जमा झाली; पण लिपिक देवेश नलवडे याने ती बोर्डाकडेही जमा केली नाही. यामुळे दहावी बोर्डाने या ३५८ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे रिसीट पाठविले नाही. त्यानंतर नलवडे याने मुख्याध्यापक यांचे लेटरहेड व शिक्का वापरून त्यावर मुख्याध्यापक यांची खोटी सही केली.

परीक्षा बोर्डाशी बोगस पत्रव्यवहार केला. यामुळे या विद्यार्थ्यांना विनारिसीट परीक्षेस बसविण्यात आले. परीक्षेचा १ फेब्रुवारी रोजी निकाल लागल्यानंतर परीक्षा शुल्क जमा नसल्याने ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. त्यामुळे शाळेने याबाबत परीक्षा बोर्डाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

चौकशी करून फौजदारी कारवाई : स्मृती पाटीलबोर्डाने परीक्षा फीसाठी सर्व ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल अडविल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील यांनी लिपिक देवेश नलवडे यास निलंबित केले. नलवडे याच्यावर फौजदारी कारवाईसाठी मिरज पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांची चौकशी होणार असून, यातील दोषींवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजexamपरीक्षाStudentविद्यार्थी