शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी आले.. पण प्रश्न नाही सुटले, पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:56 IST

शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे.

आटपाडी : टेंभूचे पाणी सध्या बहुतांश दुष्काळी तालुक्यामध्ये आले असले तरी, पाणी आल्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना संघटित ठेवून चळवळीच्या रेट्यातून दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याला यापुढील काळात प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन तेरा दुष्काळी तालुक्यांच्या पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळी तालुक्यांची २९ वी पाणी संघर्ष परिषद रविवारी आटपाडी येथे पार पडली. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, डॉ. अनिकेत देशमुख, महादेव देशमुख, शिवाजीराव पाटील, सावंता पुसावळे, सचिन देशमुख उपस्थित होते.वैभव नायकवडी म्हणाले, शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. तेरा दुष्काळी तालुक्यांतील अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी पैसे उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी गरजेप्रमाणे धडक मारण्याची तयारी ठेवली पाहिजे. चळवळीच्या रेट्यामुळे काही योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्या यशस्वीरीत्या चालविण्यासाठी यापुढील काळात लढा असेल.पाणी आलेल्या भागातील शेतकऱ्यांनी चळवळीत सहभाग होणे गरजेचे आहे. २९ वर्षांपूर्वी जे स्वप्न होते, ते आता सत्यात यायला लागले आहे. नवीन पिढीला सामावून घेणे व त्यांच्यापुढे इतिहास मांडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. यामुळे आपल्याला संघटनेची ताकद वाढवणे गरजेचे आहे. भविष्यातील संघर्षासाठी आपण तयार राहूया.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. मात्र ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजून पाेहाेचले नाही. समन्यायी पाणी वाटप योजनेचे अद्याप शासनाने नियोजन केले नाही. यासाठी चळवळीच्या माध्यमातून जनरेटा उभा करावा लागेल.

राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, सध्या निसर्ग लहरी बनला आहे. शासनही लहरी बनले आहे. त्यांच्या लहरीप्रमाणेच पाण्याचे आवर्तन सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आवर्तनाच्या नियोजनासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दादासाहेब ढेरे, शिवाजीराव पाटील, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.

नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी एक एकर जागा

आमच्या आटपाडीसारख्या दुष्काळी भागावर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे फार मोठे ऋण आहेत. त्यांचा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठीचा लढा मोठा आहे, हे येणाऱ्या नवीन पिढीला उमजावे यासाठी आटपाडीमध्ये डॉ. नागनाथअण्णांचे स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. यासाठी एक एकर जागा देणार असल्याचे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Sangliसांगली