ठकसेन जाधव फरारी

By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:45:37+5:302015-02-15T00:49:48+5:30

तपास संथगतीने : साथीदाराची कसून चौकशी

Thaksen Jadhav fugitive | ठकसेन जाधव फरारी

ठकसेन जाधव फरारी

सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयात टंकलिपिक पदावर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या ठकसेन विजय जाधव अद्याप फरारीच आहे. दरम्यान, अटकेत असलेला जाधवचा डोंबिवलीतील साथीदार संजय तडवी याची कसून चौकशी सुरू आहे.
बेरोजगार तरुणांना एकत्रित करून जाधव याने नोकरीचे आमिष दाखविले. जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीसाठी नियुक्ती केल्याचे पत्रही दिले आहे. या पत्रावर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची सही, तसेच भारतीय राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. विश्रामबाग व मिरज शहर पोलिसांतही जाधवविरुद्ध आतापर्यंत पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. जत तालुक्यातही त्याने अनेक बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात असले तरी, जाधवचा शोध कोणी घ्यायचा? असा पोलिसांना प्रश्न पडला आहे. यामुळे तपास संथगतीने सुरू आहे.
जाधवच्या या कारनाम्यात ठाण्यातील डोंबिवलीतील संजय तडवी याचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र त्याचा नेमका काय ‘रोल’ आहे, याबद्दलची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. जाधवसोबत असणारी स्मिता कन्नुरे ही महिलाही सापडलेली नाही. जाधव रहात असलेल्या गावभागातील घराला कुलूप आहे. त्याचे कुटुंबही पोलीस कारवाईच्या भीतीने निघून गेले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
शोध कोणाकडे ?
जत तालुक्यातही त्याने अनेक बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याची माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात असले तरी, जाधवचा शोध कोणी घ्यायचा? असा पोलिसांना प्रश्न पडला आहे. यामुळे पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू आहे.

Web Title: Thaksen Jadhav fugitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.