रांजणीत मेंढी विकास क्षेत्रात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:24 IST2021-04-05T04:24:25+5:302021-04-05T04:24:25+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणीपासून पाच किलोमीटर अंतरावर अहिल्यादेवी मेंढी व शेळी फार्म असून त्यातील जवळ जवळ ३४४ ...

Terrible fire in Ranjani sheep development area | रांजणीत मेंढी विकास क्षेत्रात भीषण आग

रांजणीत मेंढी विकास क्षेत्रात भीषण आग

याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणीपासून पाच किलोमीटर अंतरावर अहिल्यादेवी मेंढी व शेळी फार्म असून त्यातील जवळ जवळ ३४४ एकरावरील गवतास अचानक आग लागली. या आगीमुळे गवत, खुरटी झुडपे, बांधावरील झुडपे, बागायत प्लाॅटमधील दशरथ, तति, शेवगा, या बहुवार्षिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच झाडांना पाणी देण्यासाठी बसविलेल्या पीव्हीसी पाईप, ठिबक संच पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. आग विझवण्यासाठी क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन टँकरने पाणी तसेच नांगराचे तास घालून आग विझवण्यासाठी मदत केली. घटनेचा पंचनामा डॉ. शहाजी पाटील, निशा कांबळे, टी. टी. रायकर, उपसरपंच हनमंत देसाई तानाजी पांढरे आदींनी केला.

फोटो : ०४ शिरढाेण १

ओळ : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास क्षेत्रात शनिवारी अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले.

Web Title: Terrible fire in Ranjani sheep development area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.