‘रमाई घरकूल’च्या जाचक अटी रद्द कराव्यात : उमेश धेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:48+5:302021-04-04T04:27:48+5:30
निवेदनामध्ये म्हटले आहे की, रमाई आवास घरकूलमध्ये जिल्हा समितीने लावलेल्या जाचक अटींमुळे गैरसोय होऊन मोठ्या प्रमाणात लाेक घरकूल योजनेपासून ...

‘रमाई घरकूल’च्या जाचक अटी रद्द कराव्यात : उमेश धेंडे
निवेदनामध्ये म्हटले आहे की, रमाई आवास घरकूलमध्ये जिल्हा समितीने लावलेल्या जाचक अटींमुळे गैरसोय होऊन मोठ्या प्रमाणात लाेक घरकूल योजनेपासून वंचित राहत आहेत. शासन निर्णय १५ मार्च २०१६ नुसार रमाई आवास घरकूल योजनेची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. जिल्हा समितीने लावलेल्या जाचक अटी शिथिल करून लोकांना घरकूल योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य करावे.
केंद्र शासन व राज्य शासन प्रत्येकाला घर ही योजना राबवित आहे. मात्र, लोकांना विविध कागदपत्रे तसेच संमती पत्रासारख्या जाचक अटींमुळे त्रास होत आहे. त्यामुळे बरेच लोक पंतप्रधान आवास घरकूल योजनेकडे वळत आहेत. तरी लोकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जाचक अटी रद्द करून लोकांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.