विद्यमान महापौरांची मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:21+5:302021-02-05T07:22:21+5:30
सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर निवडीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. विद्यमान महापौरांची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपत आहे. नव्या ...

विद्यमान महापौरांची मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत
सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर निवडीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. विद्यमान महापौरांची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपत आहे. नव्या महापौरांची निवडी प्रस्ताव गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. आता मुदतीआधी निवड होणार की मुदतीनंतर याचा फैसला विभागीय आयुक्त्यांच्या हाती आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. या काळात संगीता खोत व गीता सुतार यांच्या रूपाने दोन महापौर मिळाले. विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. प्रशासकीय स्तरावर नव्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी निवडीचा प्रस्ताव तयार केला असून, गुरुवारी तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. आता विभागीय आयुक्तांकडून निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. महापालिकेने मात्र निवडीची तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून तारीख जाहीर होणार आहे.
सध्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमधून निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून मैनुद्दीन बागवान, दिग्वीजय सूर्यवंशी यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसमधून मनोज सरगर, संतोष पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीची भिस्त भाजपमधील नाराजावर आहे. त्यात उपमहापौर आनंदा देवमाने यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.