सीए परीक्षेत जिल्ह्यातील दहा तरुणांनी फडकावला यशाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:05+5:302021-09-15T04:32:05+5:30
सांगली : सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेत जिल्ह्यातील दहा तरुणांनी यशाचा झेंडा फडकावला आहे. यामध्ये नऊ मुले, तर एक ...

सीए परीक्षेत जिल्ह्यातील दहा तरुणांनी फडकावला यशाचा झेंडा
सांगली : सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेत जिल्ह्यातील दहा तरुणांनी यशाचा झेंडा फडकावला आहे. यामध्ये नऊ मुले, तर एक मुलगी आहे. जिल्ह्यासाठी हा निकाल उच्चांकी स्वरुपाचा मानला जातो.
जुलै महिन्यात अंतिम परीक्षा झाली होती, तिचा निकाल सोमवारी (दि. १३) जाहीर झाला. जुन्या अभ्यासक्रमातील ग्रुप एकमधून १७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील तिघे उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनमधील २५ विद्यार्थ्यांपैकी चौघांना यश मिळाले. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्या ग्रुपमधून ४३ जणांनी परीक्षा दिली, त्यातील पाच जण उत्तीर्ण झाले. दुसऱ्या ग्रुपमधून २६ जणांपैकी चौघे उत्तीर्ण झाले. अंतिम परीक्षेत दहा जण उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी असे : कृष्णा मालू, शुभम पवार, अभिजित पाटील, अझहरुद्दीन नायकवडी, सिद्धार्थ मालू, पुष्पांजली निशाणदार, निखिल कोरूचे, प्रतीक झंवर, अजय मंगलानी व पराग गाणबावले.
जिल्ह्यात आतापर्यंत कमाल सहा-सात विद्यार्थीच सीए परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे, यावर्षी मात्र दहा जणांनी बाजी मारली. सीए असोसिएशनच्या सांगली शाखेचे अध्यक्ष महेश ठाणेदार यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी हा निकाल उच्चांकी म्हणता येईल. परीक्षेचा एकूणच निकाल सहा-सात टक्के लागायचा, यावर्षी तो १७ टक्क्यांपर्यंत गेला आहे. सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंददायी बाब ठरली आहे.