सांगलीत घरातून दहा हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST2021-03-23T04:27:30+5:302021-03-23T04:27:30+5:30

सांगली : शहरातील पन्नास फुटीरोडवरील घराच्या खिडकीतून चोरट्यांनी काठीच्या सहाय्याने पर्स लांबविली. यात रोख साडेपाच हजार रुपयांसह पैंजण, सोन्याचे ...

Ten thousand looted from Sangli house | सांगलीत घरातून दहा हजारांचा ऐवज लंपास

सांगलीत घरातून दहा हजारांचा ऐवज लंपास

सांगली : शहरातील पन्नास फुटीरोडवरील घराच्या खिडकीतून चोरट्यांनी काठीच्या सहाय्याने पर्स लांबविली. यात रोख साडेपाच हजार रुपयांसह पैंजण, सोन्याचे डुल असा १० हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी राहिया फारूख मुल्ला (रा. गादी कारखाना, ५० फुटी रोड, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी मुल्ला व त्यांची मुले झोपले असताना, त्यांची खिडकी उघडी होती. यावेळी दोन अज्ञातांनी उघड्या खिडकीतून काठी घालत आतील पर्स अलगद लांबविली. त्यात रोख साडेपाच हजार रुपये व सोन्याचे दागिने, बँकेचे एटीएम, पॅनकार्ड, मतदान कार्ड आदी साहित्य होते. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Ten thousand looted from Sangli house