शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्स्प्रेस’च्या करंट बुकिंगवर दहा टक्के सवलत झाली बंद, रेल्वेने प्रवाशांना दिला आर्थिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:02 IST

या गाड्यात करंट बुकिंग उपलब्ध

सदानंद औंधेमिरज : रेल्वेने आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका दिला आहे. यापूर्वी आरक्षित तिकिटावरील सवलती रद्द केल्यानंतर रेल्वेने गेल्या आठवड्यापासून ‘करंट चार्ट’मधील (अंतिम यादी) प्रवाशांना  तिकिटाच्या रकमेवर देण्यात येणारी १० टक्के सवलत रद्द केली आहे. त्यामुळे  मिरजेतून येणाऱ्या - जाणाऱ्या ४० एक्स्प्रेस  गाड्यांतून  दररोज प्रवास करणाऱ्या  हजारो प्रवाशांचे नुकसान होणार  आहे.रेल्वेने कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना तिकीट दरात दिलेली सवलत रद्द केली. आता ती पुन्हा सुरू होण्याची चिन्ह नाही.  एक्स्प्रेसच्या आरक्षित तिकिटाच्या करंट बुकिंगसाठी प्रवाशांना तिकिटाच्या रकमेत देण्यात येणारी १० टक्के सवलत रेल्वेने दि. १३ मार्चपासून बंद केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली असून, आरक्षण प्रणालीत सवलतीचा पर्याय हटविण्यात आला आहे.  ही सवलत रद्द झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार आहे.नेहमी फुल्ल असणाऱ्या एक्स्प्रेसच्या आरक्षित तिकिटासाठी रेल्वे प्रीमियम दर व तत्काळ शुल्काची आकारणी करते. मिरजेतून जाणाऱ्या गोवा दिल्ली महालक्ष्मी, चन्नम्मा, गांधीधाम, अजमेर, नागपूर, पूर्णा या गाड्यांना प्रीमियम दराने तिकीट आकारणी होत असल्याने यामुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागतो. आता रेल्वेने शिल्लक असलेल्या तिकिटांवरील सवलतही रद्द केली आहे. करंट चार्टमध्ये आरक्षित तिकिटावर प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी १० टक्के सवलत  पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील यांनी केली.करंट बुकिंग काय आहेगाडीतील सीट आरक्षणाचा मुख्य चार्ट तयार झाल्यानंतर त्यात  काही सीट शिल्लक राहिल्यास रेल्वे सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी दुसरा करंट चार्ट तयार केला जातो. करंट बुकिंगची सुविधा  प्रवास सुरू होणाऱ्या आरंभीच्या स्थानकावरील गाड्यांना व मुख्य स्थानकावरून धावणाऱ्या  एक्स्प्रेस गाड्यांना लागू आहे. आरक्षित तिकिटावर सवलतीमुळे काही एक्स्प्रेसमध्ये शिल्लक राहणाऱ्या सीटदेखील भरतात. तिकिटात दहा टक्के सवलत दिल्याने प्रवाशांचाही फायदा होत होता.या गाड्यात करंट बुकिंग  उपलब्धहरिप्रिया, महालक्ष्मी, अजमेर, जोधपूर, गांधीधाम, अहमदाबाद, महाराष्ट्र, शरावती, कोयना, पूर्णा, चालुक्य, राणी चन्नम्मा, गोवा, निजामुद्दीन, दीक्षाभूमी, कलबुर्गी एक्स्प्रेस.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे