शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सांगली जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी, 'या' चार कारखान्यांकडे 'इतके' कोटी थकीत 

By अशोक डोंबाळे | Updated: March 30, 2023 17:16 IST

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने कोणते...जाणून घ्या

सांगली : जिल्ह्यातील सद्गुरू श्री श्री शुगर, क्रांती, दत्त इंडिया आणि हुतात्मा या चार साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे १६० कोटी रुपये थकीत आहेत. उर्वरित दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले मिळाली नाहीत, ते शेतकरी बँकाकडे फेऱ्या मारत आहेत.जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी २०२२-२३ वर्षाचा गळीत हंगाम घेतला होता. यापैकी सर्वच कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप संपवून हंगाम बंद केले आहेत. राजारामबापू पाटील साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी आणि जत डफळे, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर आणि केन ॲग्रो या दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंतची शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० टक्के एफआरपी जमा केली आहे. श्रीपती शुगर कारखान्याने पहिलाच गळीत हंगाम घेतला असून केवळ ५६ हजार ८३५ टन उसाचे गाळप केले. तसेच केन ॲग्रो शुगरनेही शेवटच्या टप्प्यातच गळीत हंगाम सुरू केला. परंतु, या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे जमा केले आहेत. सद्गुरू श्री श्री शुगरने ३४ कोटी २८ लाख, क्रांती कारखाना ५५ कोटी ९४ लाख, दत्त इंडिया २४ कोटी आणि हुतात्मा कारखान्याकडे ३३ कोटी ८० लाख रूपये असे एकूण १६० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत. या कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखानेराजारामबापू पाटील चारही युनिट, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया शुगर, उदगिरी शुगर, केन ॲग्रो आदी दहा साखर कारखान्यांनी दि. २३ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या उसाची १०० टक्के एफआरपीनुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाकडून दिलासा मिळाला आहे. पण, एफआरपीच्या वरच्या रकमेचे काय होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नियमाने १४ दिवसांत एफआरपीनुसार पैसे मिळाले पाहिजेत. याबद्दल सर्व साखर कारखान्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत. यातूनही काही कारखान्यांनी एफआरपीनुसार १०० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने