दक्षिण भारतात धावणाऱ्या दहा एक्स्प्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:23+5:302021-02-12T04:25:23+5:30
पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणासह हुबळी रेल्वेस्थानकात विविध कामे सुरू आहेत. दि. २५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी यार्डात रेल्वेमार्ग बदलण्यात येणार ...

दक्षिण भारतात धावणाऱ्या दहा एक्स्प्रेस रद्द
पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणासह हुबळी रेल्वेस्थानकात विविध कामे सुरू आहेत. दि. २५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी यार्डात रेल्वेमार्ग बदलण्यात येणार असल्याने दहा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. चार विलंबाने व दोन एक्स्प्रेस पुणे, दौंड, सोलापूरमार्गे वळविण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या रेल्वे गाड्या दि. १६ ते २५ फेब्रुवारीपर्यंत हुबळी-दादर एक्स्प्रेस, दि. १७ ते २६ पर्यंत दादर-हुबळी एक्स्प्रेस (दि .२२ व २३ रोजी तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस, दि. २३ व २४ रोजी, कोल्हापूर तिरुपती, दि . १५ व १७ रोजी बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, दि. १८ व २० रोजी जोधपूर-बंगळुरू, दि . २० रोजी बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस .दि .२३ रोजी गांधीधाम-बंगळुरू एक्स्प्रेस, दि. १६ व १८ रोजी म्हैसूर-अजमेर, दि .२५ रोजी अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दि. २३ व २४ रोजी मिरज-बंगळुरू एक्स्प्रेस, दि. २३ रोजी यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, दि.२४ रोजी यशवंतपूर-निजामुद्दीन व दि.२३ रोजी निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. दि. १७ रोजी जोधपूर-बंगळुरू व दि. २२ रोजी अजमेर- बंगळुरू, पुणे, दौंड, सोलापूरमार्गे धावणार आहेत.