शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू, ताकारीसह विस्तारित म्हैसाळही सौर ऊर्जेवर येणार; माजी खासदार संजय पाटील यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 16:45 IST

म्हैसाळ सौर ऊर्जेचे तीन महिन्यांत काम सुरू होणार

सांगली : म्हैसाळ योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार ५९४ कोटींची तरतूद केली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत सौर ऊर्जेच्या कामाला सुरुवात होणार आहे. म्हैसाळनंतर टेंभू, ताकारी आणि विस्तारित म्हैसाळ योजनाही सौर ऊर्जेवर येणार आहेत, अशी माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी सांगलीत मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.संजय पाटील म्हणाले, म्हैसाळ पथदर्शी उपक्रम राबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली. देशातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणारा पहिला प्रकल्प आहे.टप्प्याटप्प्याने टेंभू आणि ताकारी, आरफळ योजनादेखील सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर आल्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला, मंगळवेढा तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचन योजना चालवताना शेतकऱ्यांवर वीज बिलाचा बोजा जास्त असतो. योजना चालवताना अडचणी येतात, म्हैसाळ योजनेचे सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांचे बिल येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी मान्यता दिली आहे. जर्मन बँक ७० टक्के आणि राज्य सरकार ३० टक्के निधी देणार आहे.म्हैसाळ योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास एक हजार ५९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सौर ऊर्जेमुळे वीज बिल थकबाकीचा प्रश्न सुटणार आहे. जत तालुक्यातील संख येथे २०० हेक्टरवर होणार प्रकल्प होणार आहे. २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे. सर्व प्राथमिक सर्वेक्षण, तपासण्या केल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत काम सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रथमच ४० टीएमसी पाणी उचललेजिल्ह्यातील दुष्काळी भागात यावर्षी उन्हाळ्यात आपण आजपर्यंत कधीच मिळाले नाही, इतके पाणी सोडले. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या माध्यमातून इतिहासात प्रथमच ४० टीएमसी पाणी मिळालेे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेच्या वीजनिर्मितीसाठी लागणारे ८ टीएमसी अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्याला दिले आहे, असा दावाही संजय पाटील यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीsanjaykaka patilसंजयकाका पाटील