ऐतवडे बुद्रुकमधील वादग्रस्त तलाठ्याची तहसीलदारांकडून कानउघडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:56+5:302021-09-10T04:33:56+5:30
ऐतवडे बुद्रुक येथील ऑनलाईन सातबारावरील नाेंदीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदार सबनीस यांनी ऐतवडे बुद्रुकला भेट दिली. यावेळी अणेकर ...

ऐतवडे बुद्रुकमधील वादग्रस्त तलाठ्याची तहसीलदारांकडून कानउघडणी
ऐतवडे बुद्रुक येथील ऑनलाईन सातबारावरील नाेंदीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदार सबनीस यांनी ऐतवडे बुद्रुकला भेट दिली. यावेळी अणेकर हे तहसीलदारांसमाेर आवाज चढवून बाेलू लागले. यावेळी सबनीस यांनी त्यांना ‘तुम्ही कोणाच्या समोर बोलत आहात समजते का? खालच्या आवाजात बोला. माझ्यासमोर असे बोलत असाल तर लाेकांशी कसे वागता? तुमच्या कामाची पद्धत यावरुन समजते.’ अशा शब्दात त्यांची कानउघडणी केली. ‘जे काम चार दिवसात होते त्याला तुम्ही जाणूनबुजून दोन वर्ष लावली. इथून पुढे शेतकऱ्यांशी बोलताना नम्रपणेच बोलायचे’, असा दम दिला.
यावेळी सातबारा उताऱ्यावर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी १६ व १७ सप्टेंबर रोजी शिबिर घेणार असल्याचे सबनीस यांनी सांगितले. यावेळी चिकुर्डे, कुरळपचे मंडल अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कोळी, सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच अशोक दिंडे, महावीर पाटील, सौरभ पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.