‘टीम सत्यजीत’ कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:43 IST2021-05-05T04:43:51+5:302021-05-05T04:43:51+5:30

पुनवत : भाजपचे नेते सत्यजीत देशमुख यांच्या युवा कार्यकर्त्यांची ‘टीम सत्यजीत’ शिराळा-वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांना बेड, रुग्णवाहिका, रक्त, व्हेंटिलेटर ...

‘Team Satyajit’ continues to help during Corona’s time | ‘टीम सत्यजीत’ कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे

‘टीम सत्यजीत’ कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे

पुनवत : भाजपचे नेते सत्यजीत देशमुख यांच्या युवा कार्यकर्त्यांची ‘टीम सत्यजीत’ शिराळा-वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णांना बेड, रुग्णवाहिका, रक्त, व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेत आहे.

भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्त्यांची फळी शिराळा-वाळवा तालुक्यांत काम करीत आहे. त्यांनी तालुक्यात आतापर्यंत ३० पेक्षा जास्त कोविड रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले आहेत. पणुंब्रे वारुण, शिराळा, इस्लामपूर, पुनवत, सागाव, कुरळप, बोरगाव, वाळवा, जत, पलूस, कडेगाव, बोरगाव आदी गावातील कोविड रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन रुग्णालयात पोहोचविले आहे. काही रुग्णांना पुणे, मुंबईला हलविण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे.

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रक्त, रुग्णवाहिका, इंजेक्शन मिळवून देण्यासाठी टीमचे राज नदाफ, प्रथमेश पाटील, अधिक चरापले, प्रतीक साळुंखे, प्रतीक बागणीकर, संतोष कोपार्डे आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

चौकट

रुग्णांच्या नातेवाइकांना मदत

रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क साधून नातेवाइकांना धीर देण्यापर्यंतचे काम ही टीम करीत आहे.

Web Title: ‘Team Satyajit’ continues to help during Corona’s time