राज्यस्तरीय ‘टेनिसबॉल’ स्पर्धेसाठी संघ जाहीर

By Admin | Updated: November 2, 2014 23:29 IST2014-11-02T22:13:09+5:302014-11-02T23:29:42+5:30

विट्यात चाचणी : नाशिकमध्ये स्पर्धा

The team announced for the state-level 'tennisball' tournament | राज्यस्तरीय ‘टेनिसबॉल’ स्पर्धेसाठी संघ जाहीर

राज्यस्तरीय ‘टेनिसबॉल’ स्पर्धेसाठी संघ जाहीर

सांगली : राज्यस्तरीय सोळा वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल साळुंखे व सचिव विजय कुंभार यांनी संघाची घोषणा केली.
विटा (ता. खानापूर) येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य म्हणून बशिर मुल्ला (कडेगाव), शोएब शिकलगार, सुदर्शन पाटील व दीपक पवार (विटा), विश्वास शिंदे (वांगी) यांनी काम पाहीले.
यावेळी निवडण्यात आलेला सांगली जिल्हा संघ असा : कुणाल नांगरे, शिवम तडसरे, प्रफुल्ल धर्मे, प्रतीक पाटील, इंद्रजीत मोहिते, संकेत मोहिते, संदेश डोंब, महंमद शेख, सद्दाम सोण्यांर, अर्जुन
कुंभार.
सांगली शहर संघ : तुषार चव्हाण, अनिकेत गायकवाड, सवीन शेट्टी, प्रतीक पाटील, प्रथमेश बंडगर, सोमनाथ सुळे, अथर्व देवकर, संदेश काळे, आकाश भोसले, प्रथमेश
पवार.
हा संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. (वार्ताहर)

Web Title: The team announced for the state-level 'tennisball' tournament