शिक्षक बँकेत महिलांना समान संधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST2021-02-19T04:15:23+5:302021-02-19T04:15:23+5:30

सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकीमध्ये पुरुष सभासदांबरोबरच महिला सभासदांना समान संधी देणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष ...

Teachers will give equal opportunity to women in the bank | शिक्षक बँकेत महिलांना समान संधी देणार

शिक्षक बँकेत महिलांना समान संधी देणार

सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या आगामी निवडणुकीमध्ये पुरुष सभासदांबरोबरच महिला सभासदांना समान संधी देणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी सांगितले.

जत येथे महिला शिक्षक मेळाव्यानिमित्त ते बोलत होते. शिक्षक बँकेच्या इतिहासामध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेशिवाय महिला सभासदांना कधीच संधी देण्यात आलेली नाही. मात्र शिक्षक संघाच्या स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलमध्ये महिलांना जास्तीत- जास्त संधी देण्यात येईल. शिक्षक संघाकडे एक वर्षाची सत्ता असताना शिक्षक बँकेमध्ये सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराची योजना शिक्षक संघानेच सुरू केली. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये महिला सभासदांसाठी विविध कर्जाच्या व ठेवीच्या योजना सुरू करू, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव म्हणाले, महिला सभासद शिक्षक बँकेचा कारभार काटकसरीने करतील. त्यामुळे त्यांना संधी देणे गरजेचे आहे. यावेळी राज्य उपाध्यक्षा स्वाती शिंदे-पवार, धनश्री घाटगे, कमल पवार, सोनाली चव्हाण, सुप्रिया पाटील, सुनीता वसावे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी वाघमारे, मीनाक्षी शिंदे, रेहाना नदाफ यांच्याबरोबरच जत तालुका शिक्षक संघाच्या महिला आघाडीने केले

फोटो १८ शीतल ०१

Web Title: Teachers will give equal opportunity to women in the bank