शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:45+5:302021-06-16T04:35:45+5:30
फोटो ओळ : जत येथील शाळा नंबर दोनच्या परिसरात गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जैनुदिन ...

शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे
फोटो ओळ : जत येथील शाळा नंबर दोनच्या परिसरात गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जैनुदिन नदाफ, दिगंबर सावंत, अलका गायकवाड, जान्हवी भोसले, सुनीता इरकर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन ऑनलाईन, ऑफलाईनसह विविध साधनांचा वापर करून मुलांना शिक्षण द्यावे. पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे. असा सल्ला गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात यांनी दिला.
जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोनच्या परिसरात गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात
यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात, विस्तार अधिकारी टी. एल. गवारी यांच्याहस्ते झाले.
गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात यांंचा मुख्याध्यापक जैनुदिन नदाफ यांनी 'शिवाजी कोण होता' पुस्तक देऊन सत्कार केला. दिगंबर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मुख्याध्यापक जैनुदिन नदाफ, दिगंबर सावंत, अलका गायकवाड, जान्हवी भोसले, सुनीता इरकर, श्रुतिका मडवले, कल्पना माने उपस्थित होते.