शिक्षकांची फंड रक्कम मंजुरी प्रक्रिया सुलभ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:09+5:302021-08-24T04:30:09+5:30
सांगली : शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणासाठी क प्रमाणपत्राबरोबरच रहिवासाबाबतचे स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरून ही प्रक्रिया सुलभ करण्याची ग्वाही ...

शिक्षकांची फंड रक्कम मंजुरी प्रक्रिया सुलभ करणार
सांगली : शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणासाठी क प्रमाणपत्राबरोबरच रहिवासाबाबतचे स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरून ही प्रक्रिया सुलभ करण्याची ग्वाही शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने कांबळे यांची भेट घेतली. संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अजित पाटील, अरुण पाटील, पोपट सूर्यवंशी, श्यामगोंडा पाटील उपस्थित होते. विज्ञान विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणी मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच वेतन श्रेणी देण्यात येईल. उर्दू व कन्नड माध्यम वरिष्ठ मुख्याध्यापक पदोन्नतीची अंतिम ज्येष्ठता यादी पाठवून ही प्रक्रिया राबवली जाईल. विज्ञान विषय शिक्षकांच्या वेतन श्रेणीबरोबरच काही अटींच्या अधीन राहून केंद्रप्रमुख पदांची भरतीही करण्यात येईल. विषयनिहाय समतोल राखून विषय शिक्षक पदावनतीची प्रक्रिया राबविली जाईल, अशी ग्वाहीही कांबळे यांनी दिली.
यावेळी उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कक्ष अधिकारी मोहिते, शिक्षक संघाचे हंबीरराव पवार, तानाजी खोत, शशिकांत माणगावे, संतोष जगताप, शब्बीर तांबोळी, नितीन चव्हाण उपस्थित होते.