शिक्षकांनो, अगोदर मुलं प्रगत करा...!
By Admin | Updated: July 10, 2016 00:59 IST2016-07-10T00:40:15+5:302016-07-10T00:59:41+5:30
औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत.

शिक्षकांनो, अगोदर मुलं प्रगत करा...!
औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत. ती शिकली पाहिजेत. आमची बांधिलकी गुरुजींसोबत नाही, ती मुलांसोबत आहे, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी आज येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले की, गुरुजींनी शाळेच्या वेळेत व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करावी की अन्य काही करावे, यासंबंधी आमची कसलीही हरकत नाही. बस्स, जिल्हा परिषद शाळांतील मुले प्रगत झाली पाहिजेत. हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संपूर्ण राज्यातील जि. प. शाळांतील मुले डिसेंबर २०१७ पर्यंत प्रगत झाली पाहिजेत, हा आमचा संकल्प आहे; परंतु औरंगाबादसह राज्यातील काही जिल्हा परिषद शिक्षकांचा विश्वास आहे की, आम्ही डिसेंबर २०१७ नव्हे, तर एक वर्ष अगोदरच (डिसेंबर २०१६) मुलं प्रगत करून दाखवू. शिक्षकांवर कोणत्याही गोष्टीची सक्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत शाळांतील मुलांना लिहिता येत नाही की वाचताही येत नाही, ही खाजगी शाळांमार्फत पसरविलेली अफवा आहे. ज्यामुळे जि. प. शाळांवर असलेला विश्वास उडेल व ती मुले खाजगी शाळेत येतील, या हेतूने पसरविलेली ती अफवा आहे, असेही नंदकुमार म्हणाले.
सक्ती नाही
शिक्षकांवर ‘ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धत लादली जातेय’ याकडे नंदकुमार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिक्षकांवर कोणतीही अध्यापन पद्धत लादलेली नाही.
४ज्या अध्यापन पद्धतीमुळे मुले प्रगत होत असतील, ती पद्धत शिक्षकांनी अंगिकारावी. शिक्षकांना ‘ज्ञानरचनावाद’ ही शिक्षण पद्धत सक्तीची करण्यात आलेली नाही. शिक्षकांनी कोणती अध्यापन पद्धत अवलंबावी. तो शाळेत काय करतो. तो मुख्यालयी राहतो की नाही, यावर आमचा कोणताही आक्षेप नाही.
४मात्र, मुले शिकली पाहिजेत. जर ती शिकली नसतील, तर ती का शिकली नाहीत, याचा आम्ही जाब विचारू. यावर शिक्षकांनीच आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे सांगून शिक्षक संघटनांचे वाढते ‘फॅड’ किंवा शिक्षकांमध्ये वाढत चाललेल्या ‘पुढारपणा’बद्दल उत्तर देण्यास नंदकुमार यांनी पद्धशीरपणे बगल दिली.