शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीवरील शिक्षकाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:54 IST

सांगली जिल्ह्यात पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतनीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला ट्रक चालकाने चिरडले. या घटनेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देनाकाबंदीवरील शिक्षकाला ट्रकने चिरडलेट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात डफळापूरनजीक कारवाईवेळी घडली दुर्घटना

डफळापूर (जि. सांगली) : शिंगणापूर (ता. जत) येथील चेकपोस्टवर कार्यरत असताना भरधाव जाणाऱ्या ट्रकला अडविण्याच्या प्रयत्नात एक शिक्षक त्याच ट्रकखाली चिरडून ठार झाला. नानासाहेब सदाशिव कोरे (वय ३४, रा. डफळापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मंगळवार, दि. १२ रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. घटनेनंतर ट्रक चालक हणमंत रामचंद्र मोर्डी (रा. दौंड, पुणे) हा जत पोलिसात हजर झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिंगणापूर येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांसह एक डॉक्टर, दोन शिक्षक, दोन ग्रामपंचायत कर्मचारी, दोन पोलिसपाटील, दोन डाटा आॅपरेटर तैनात असतात. येथे पाच दिवसांपासून नानासाहेब कोरे हे कार्यरत होते.मंगळवारी पहाटे शिरोळहून एका टेम्पोतून २४ कामगार गुगवाड (ता. जत) येथे  निघाले होते. त्यांना होम क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया शिंगणापूर चेकपोस्टवर सुरू होती. याच दरम्यान कर्मचारी कामात व्यस्त असताना कर्नाटकमधून सिमेंट घेऊन भरधाव आलेले ट्रक (क्र. एम. एच. १२, एल. टी. ९७४९) चेकपोस्टवर न थांबता थेट डफळापूरच्या दिशेने गेला.

यावेळी नानासाहेब कोरे व जिरग्याळ येथील डाटा आॅपरेटर संजय चौगुले यांनी दुचाकीवरून (क्र. एम. एच. १०, ए. झेड. ८७४३) ट्रकचा पाठलाग सुरू केला. डफळापूर-सांगली मार्गावर डफळापूरनजीक एका वळणावर त्यांनी दुचाकी ट्रकच्या पुढे नेत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकची दुचाकीला धडक बसून नानासाहेब कोरे ट्रकखाली चिरडले गेल्याने ते जागीच ठार झाले, तर संजय चौगुले बाजूला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले.जतचे गटविकास अधिकाऱ्यांनी नानासाहेब कोरे यांची शिंगणापूर चेकपोस्टवर नेमणूक केली होती. पाच दिवस त्यांनी तेथे सेवा बजावली. कोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी भेट दिली. जत पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली