शिक्षक बँकेने कर्ज मर्यादा वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:51+5:302021-05-24T04:24:51+5:30
संख : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने व्याजदर कमी करून ३५ लाखांवरून ४० लाख रुपये कर्ज मर्यादा वाढवावी. ...

शिक्षक बँकेने कर्ज मर्यादा वाढवावी
संख : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने व्याजदर कमी करून ३५ लाखांवरून ४० लाख रुपये कर्ज मर्यादा वाढवावी. सर्व कर्जाला एक अंकी व्याजदर करावा, अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस गुंडा मुंजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सध्या कोरोनामुळे संपूर्ण प्राथमिक शिक्षक शासनाच्या आदेशाने वेगवेगळ्या उपाययोजनेसाठी कार्यरत आहेत. अशातच शासनाकडून प्राथमिक शिक्षकांचे पगार होण्यास विलंब होत आहे. त्यात शिक्षक बँकेचे बऱ्याच सभासदांनी पूर्ण क्षमतेने कर्ज काढले आहे. यासाठी कर्जांचे हप्ते वाढवावेत.
बँकेची कर्ज मर्यादा ३५ लाख रुपये आहे. यामध्ये व्याजाचे दर वेगवेगळे आहेत. तसे न करता सर्व कर्जाला एक अंकी व्याजदर करावा. ३५ लाख रुपयांवरून ४० लाख रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी.
सध्या कोरोना संकटाने काही सभासद शिक्षकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोविडचे कर्ज १ लाखाऐवजी ५ लाख रुपये करावे. सध्या अत्यंत गरजेचे कर्ज कोविडचे आहे, ते मिळावे. त्यासाठी करार बंदपत्रासाठी स्टॅम्पची आवश्यकता आहे; परंतु लाॅकडाऊनमुळे स्टॅम्प मिळत नाहीत. स्टॅम्प रक्कम बँकेने घ्यावी. स्टॅम्पमुळे रोखे अडवू नका, अशी मागणी गुंडा मुंजे यांनी केली.