कर सल्लागार, लेखापालांचे जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:05+5:302021-02-05T07:24:05+5:30
जीएसटीच्या जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील कर सल्लागार व सनदी लेखापाल सहभागी झाले होते. यावेळी कर सल्लागार अँड अमोल ...

कर सल्लागार, लेखापालांचे जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन
जीएसटीच्या जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील कर सल्लागार व सनदी लेखापाल सहभागी झाले होते. यावेळी कर सल्लागार अँड अमोल माने म्हणाले, जीएसटी नियमात वारंवार होणाऱ्या बदलामुळे कर सल्लागार व करदात्यांना त्रास होत आहे. नियमात वारंवार बदल करण्यांत येऊ नये. वारंवार येणारी स्पष्टीकरणे अधिसूचना बंद करून ती एका विशिष्ट कालावधीत द्यावीत. आवक कर परतावा आयटीसी मिळताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने त्याबद्दल शासनाने नियम सोपे व सुलभ करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात सनदी लेखापाल विवेक लेले, उमेश सारडा, रमेश जोशी, डी. एस. पालकर, अविनाश चव्हाण, रघुनाथ गिद्दे, अमित लुल्ला यांच्यासह कर सल्लागार, वकील सहभागी होते.
फाेटाे : २९ मिरज १
ओळ : सांगली केंद्रीय जीएसटी सहायक आयुक्त मोहन वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधीक्षक निवेन तेलंग, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेंढेकर, निरीक्षक महेंद्रसिंग उपस्थित होते.