तासगावची मते चालतात, विद्यापीठ उपकेंद्र का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:57+5:302021-07-07T04:33:57+5:30
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील नेत्यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र ...

तासगावची मते चालतात, विद्यापीठ उपकेंद्र का नाही?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील नेत्यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यात व्हावे, यासाठी आटापिटा सुरू केला आहे. मात्र या नेत्यांना विधानसभा निवडणूक लागली की तासगाव तालुक्यातील विसापूर मंडलमधील जनतेचे मतदान चालते. मात्र तासगाव तालुक्यात झालेले विद्यापीठाचे उपकेंद्र का चालत नाही, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
बस्तवडे ठिकाण जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळेच तेथे उपकेंद्र व्हावे यासाठी मागणी झाली होती. बस्तवडेची जागा योग्य आहे की नाही, हा निर्णय विद्यापीठातील अधिकारी घेतील. मात्र त्यापूर्वीच नेत्यांनी स्वार्थासाठी राजकीय दबाव आणण्यास सुरुवात केली आहे, हे चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने राजकीय दबाव आणून निर्णय बदलण्याची हालचाल सुरू केल्यास तासगाव तालुक्यातील सर्वपक्षीयांना एकत्रित करून आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला.