तासगावचे कृषी कार्यालय काटेरी झुडपांच्या दाटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:23+5:302021-05-30T04:22:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कवठे एकंद : तासगाव तालुका कृषी कार्यालयाची वाटचाल उदासीन दिसत असून, तासगाव येथील कृषी कार्यालयाची ...

तासगावचे कृषी कार्यालय काटेरी झुडपांच्या दाटीत
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे एकंद : तासगाव तालुका कृषी कार्यालयाची वाटचाल उदासीन दिसत असून, तासगाव येथील कृषी कार्यालयाची अवस्थाही चिंताजनक आहे. तासगाव-सांगली मार्गावर कवठे एकंद व तासगावदरम्यान तालुका कृषी कार्यालय आहे. मात्र, काटेरी झाडेझुडपे आणि तण-वेलींच्या गर्दीत हरवल्याचा भास होतो.
तालुका कृषी कार्यालयाचा मोठा फलकही लावल्याचे दिसून येत नाही. तासगाव कृषी कार्यालय मोक्याच्या जागी असूनही झुडपात दडले आहे.
काही कामानिमित्त शेतकरी गेलाच तर प्रत्येक कामाला ऑनलाइन भरलेय का, अशी विचारणा केली जाते. प्रत्येक गोष्ट ऑनलाइन आणि डिजिटलची मागणी करणाऱ्या कार्यालयाला किमान स्पष्ट दिसेल, असा बोर्ड नसणे ही शोकांतिका वाटते.
फोटो ओळी : तासगाव-सांगली मार्गावर असणाऱ्या तासगाव तालुका कृषी कार्यालयाभोवती झुडपांची दाटी आणि फलकाची अवस्था.