तासगावात सत्ताधाऱ्यांचा कापूर ओढ्यात उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:42+5:302021-03-04T04:50:42+5:30

फोटो-०३तासगाव७ फोटो ओळ : तासगाव येथे कापूर ओढ्यात नगरपालिकेकडून स्ट्रीट लाईटचे खांब उभे करुन ओढ्यात उजेड पाडण्यात आला आहे. ...

In Tasgaon, the ruling party lights up the Kapoor camp | तासगावात सत्ताधाऱ्यांचा कापूर ओढ्यात उजेड

तासगावात सत्ताधाऱ्यांचा कापूर ओढ्यात उजेड

फोटो-०३तासगाव७

फोटो ओळ : तासगाव येथे कापूर ओढ्यात नगरपालिकेकडून स्ट्रीट लाईटचे खांब उभे करुन ओढ्यात उजेड पाडण्यात आला आहे.

तासगाव : तासगाव नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहर विकासासाठी सुरू केलेल्या आटापिट्यातून आता थेट कापूर ओढ्यातच उजेड पाडण्याची कामगिरी केली आहे. कापूर ओढ्यात यापूर्वी ओढा सुशोभिकरणासाठी केलेल्या कामाच्या ठिकाणी आता स्ट्रीट लाईटची जोडणी केली आहे. मात्र याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून सुशोभिकरणाऐवजी गरज असणाऱ्या ठिकाणी स्ट्रीट लाईट उभारावी, अशी मागणी होत आहे.

ओढा सुशोभिकरणाच्या नावाखाली सुमारे ७५ लाख रुपयांच्या निधीचा चुराडा झाला. ओढ्यात दोन्ही काठावर पेव्हिंग ब्लाॅक बसवून नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार केले होते. ओढा सुशोभिकरणाचा निधी खर्च वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सत्ताधाऱ्यांवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.

यातच आता थेट ओढा पात्रात स्ट्रीट लाईटचे खांब उभारले आहेत. ओढ्यात यापूर्वी बांधलेल्या वॉकिंग ट्रॅक लगत अकरा खांब उभारले असून ओढा पात्रात उजेड पाडण्याची किमया सत्ताधाऱ्यांनी केली आहे. वास्तविक दोन वर्षांत तळीराम आणि डुकरांचा वावर वगळता या वॉकिंग ट्रॅकचा उपयोग नागरिकांनी केल्याचे कधीच दिसून आले नाही.

कोट

शहरातील नागरिकांकडून वॉकिंग ट्रॅकचा वापर केला जात आहे. नागरिकांची सोय व्हावी, यासाठीच पालिकेकडून कापूर ओढ्यात स्ट्रीट लाईटची उभारणी केली आहे. लवकरच ओढ्याच्या पात्रालगत वृक्ष लागवड करून ओपन जीम आणि खेळणी बसवून गार्डन उभारणार आहे.

- जाफर मुजावर, पक्षप्रतोद, भाजप.

कोट

गल्लीत अंधार आणि ओढ्यात उजेड असाच सत्ताधाऱ्यांचा कारभार आहे. क्रीडा संकुलासह शहरात अनेक ठिकाणी, विस्तारित भागात काळोखाचे साम्राज्य आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून ओढा पात्रात उजेड करून तळीरामांची सोय केली आहे.

- अभिजीत माळी, नगरसेवक, राष्ट्रवादी.

Web Title: In Tasgaon, the ruling party lights up the Kapoor camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.