तासगाव कारखाना; आज मुंबईत बैठक

By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-31T00:08:38+5:302014-08-31T00:14:30+5:30

सांगली : तासगाव साखर कारखान्यासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासमवेत अधिकारी व कामगार नेत्यांची उद्या (रविवार) मुंबईत बैठक होत आहे.

Tasgaon factory; Today's meeting in Mumbai | तासगाव कारखाना; आज मुंबईत बैठक

तासगाव कारखाना; आज मुंबईत बैठक

सांगली : तासगाव साखर कारखान्यासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासमवेत अधिकारी व कामगार नेत्यांची उद्या (रविवार) मुंबईत बैठक होत आहे. दरम्यान, राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत कारखान्याच्या प्रस्तावासंदर्भत चर्चा झाली; मात्र याबाबतचा निर्णय सोमवारी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तासगाव कारखान्याबाबात उद्या डॉ. पतंगराव कदम यांनी चर्चेसाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कारखाना बचाव कृती समितीचे नेते श्रीकांत लाड उपस्थित राहणार आहेत. यसाठी तासगाव कारखाना कामगार संघटनेचे पदाधिकारीही आज मुंबईला रवाना झाले. तासगाव कारखान्याची फेरनिविदा काढण्यासह दीर्घ मुदतीने भाड्याने देणे आणि विक्री विषयावर निर्णय घेण्यासाठी आज (शनिवार) प्रशासकीय मंडळाची बैठक मुंबईत बोलावण्यात आली होती. याबाबत चर्चा झाली; मात्र निर्णय झाला नाही. बैठकीला राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, तासगाव साखर कामगार नेते आर. डी. पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Tasgaon factory; Today's meeting in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.