शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या 'मंडलाधिकाऱ्या'ने ठोकली धूम, 'एसीबी'ने पाठलाग करून केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 14:55 IST

आपणावर 'अँटिकरप्शन'ची कारवाई होतेय, हे लक्षात आल्यानंतर गारळे यांनी कॉलेज वरून थेट भिलवडी नाक्यातील धनगर वाड्याकडे धूम ठोकली.

तासगाव : तासगावचा मंडलाधिकारी गब्बर सिंग गारळे याला आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लाच स्वीकारल्यानंतर गारळे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अक्षरशः पाठलाग करून पकडले. कुमठे येथील एका तक्रारदाराला केसमध्ये मदत करण्यासाठी गारळे यांनी ही लाच मागितली होती.याबाबत माहिती अशी, कुमठे येथील एकाची मंडल अधिकारी गारळे यांच्यासमोर एका तक्रारीची सुनावणी सुरू आहे. 'या सुनावणीत तुम्हाला मदत करतो', असे सांगून गारळे याने संबंधिताला दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गारळे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केला होता.त्यानुसार आज 'लाचलुचपत'च्या पथकाने त्याच्याविरोधात सापळा रचला. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तक्रारदाराला गारळे यांच्याकडे पाठविण्यात आले. यावेळी गारळे यांनी 'तुम्हाला केसमध्ये मदत हवी असेल तर मला दहा हजार रुपये द्यावे लागतील', अशी मागणी केली. मात्र तक्रारदाराने इतक्या पैशांची जुळणी होणार नाही, असे सांगितले. तडजोडीअंती आठ हजार रुपयांचा सौदा ठरला.या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर तक्रारदाराला आठ हजार रुपये घेऊन पुन्हा गारळे यांच्याकडे पाठविण्यात आले. यावेळी तासगाव येथील कॉलेज चौकात तक्रारदाराकडून आठ हजार रुपये घेताना गारळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र आपणावर 'अँटिकरप्शन'ची कारवाई होतेय, हे लक्षात आल्यानंतर गारळे यांनी कॉलेज वरून थेट भिलवडी नाक्यातील धनगर वाड्याकडे धूम ठोकली.

यावेळी एसीबीच्या पथकाने त्याचा थरारक पाठलाग केला. भर रस्त्याने हा थरार सुरू होता. एसीबीचे पथक जवळ आल्यानंतर मंडल अधिकारी गारळे हे रस्त्यावर दुचाकी व पैसे टाकून पळून गेले. पळून जाता - जाता ते रस्त्याकडेच्या हत्ती ग्रासमध्ये घुसले. मात्र पथकाने रस्त्याकडेच्या हत्तीमधून त्यांना पकडले. त्यामुळे या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा आहे.आठवडाभरापूर्वीच तासगाव तहसील कार्यालयातील पतंग कसबे या उमेदवाराला 'अँटिकरप्शन'ने लाच घेताना पकडले होते. त्यापूर्वी खंडू निकम यां सेवानिवृत्त लिपीकालाही तहसिल कार्यालयातच लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यामुळे तासगावच्या महसूल विभागाला लाचखोरीची कीड लागली आहे, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस