तासगाव बँकेने जत तालुक्यात कोल्ड स्टोअरेज उभारावे : सुभाष गोब्बी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST2021-09-25T04:26:32+5:302021-09-25T04:26:32+5:30

तासगाव अर्बन बँकेतर्फे कोरोना कालावधीत स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या याेद्धांचा सन्मान बँकेचे अध्यक्ष महेश हिंगमिरे ...

Tasgaon Bank should set up cold storage in Jat taluka: Subhash Gobbi | तासगाव बँकेने जत तालुक्यात कोल्ड स्टोअरेज उभारावे : सुभाष गोब्बी

तासगाव बँकेने जत तालुक्यात कोल्ड स्टोअरेज उभारावे : सुभाष गोब्बी

तासगाव अर्बन बँकेतर्फे कोरोना कालावधीत स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या याेद्धांचा सन्मान बँकेचे अध्यक्ष महेश हिंगमिरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डाॅ. विवेकानंद राऊत, डाॅ. राजेश जिवाण्णावर, डाॅ. दीपक जेऊर, डाॅ. मुदस्सर तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला.

हिंगमिरे म्हणाले, तासगाव अर्बन काे-ऑपरेटिव्ह बँक ही नऊ शाखेतून चांगल्याप्रकारे ग्राहकांची सेवा करीत आहे. जत शाखाही चांगल्याप्रकारे काम करणारी व अल्पावधीतच पंचवीस कोटी ठेवी जमा करणारी दोन नंबरची शाखा ठरली आहे. या बँकेत ग्राहकांनी आपल्या ठेवी ठेवाव्यात. कोरोना योद्धांनी सामाजिक जाणीव ठेऊन केलेले काम प्रेरक आहे.

यावेळी संचालक मनोज जेऊर, शशिकांत काळगी, सुभाष गोब्बी, दत्ता सगरे, किशोर हिंगमिरे, अमोल सावंत, रावसाहेब पाटील उपस्थित होते.

240921\1624-img-20210924-wa0037.jpg

तासगाव बँकेने जत तालुक्यात कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी - सुभाष गोब्बी

Web Title: Tasgaon Bank should set up cold storage in Jat taluka: Subhash Gobbi