तमाशा कलावंतांचे मजबूत संघटन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:56+5:302021-09-16T04:33:56+5:30

पलूस येथे उमा-बाबाची तमाशा संघटना, सांगली आणि सप्तरंग सांस्कृतिक कला मंच पलूस यांच्या वतीने तमाशा फडमालक आणि कलावंतांच्या कार्यशाळेत ...

Tamasha should have a strong association of artists | तमाशा कलावंतांचे मजबूत संघटन हवे

तमाशा कलावंतांचे मजबूत संघटन हवे

पलूस येथे उमा-बाबाची तमाशा संघटना, सांगली आणि सप्तरंग सांस्कृतिक कला मंच पलूस यांच्या वतीने तमाशा फडमालक आणि कलावंतांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहास पुदाले होते. सांगली जिल्हा वृद्ध मानधन कलाकार कमिटीचे अध्यक्ष एम.जी. पाटील व उपाध्यक्ष अविनाश कुदळे प्रमुख उपस्थित होते.

बाळासाहेब पवार म्हणाले, कलावंतांना उतार वयात मानधन मिळणे गरजेचे आहे. यासाठी आता मजबूत संघटन बांधणी केली पाहिजे. तरच तमाशा कलाकारांचे प्रश्न मार्गी लागतील.

एम.जी. पाटील म्हणाले, शासनाच्या खात्यावर या कलाकारांचे बरेच पैसे शिल्लक आहेत. त्याचे नियोजन होण्यासाठी व हे पैसे वापरण्यासाठी मजबूत संघटन हवे.

अविनाश कुदळे म्हणाले, कलावंतांनी मानधनाची प्रकरणे देताना काही त्रुटी ठेवू नयेत. काहीवेळा प्रस्ताव चांगला असतो पण उत्पन्नाचा दाखला जुना असतो, याचे भान कलावंतांनी ठेवूनच प्रकरणे द्यावीत.

डॉ. संपतराव पार्लेकर, भास्कर सदाकळे, मंगेश सकट, ओंकार भोसले, सुनील कोळी, संजय कुऱ्हाडे, सोमनाथ होमकर, यशवंत कदम यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. राजा पाटील, मुरलीधर शिंदे, मुबारक बोरगावकर, आझाद बोरगावकर, शहाजी मनवकर, नवनाथ मनवकर, हणमंत सदाकळे, बजरंग माडगूळकर, अशोक वारे, मुरा कासेगावकर, मधुकर लोंढे, माया तासगावकर, पुष्पा उब्रजकर, सीमा जावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Tamasha should have a strong association of artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.