शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
2
पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
3
नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर
4
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आधार अपडेट केलं नाही तर ब्लॉक होणार YONO App?
5
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
6
बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
7
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
8
"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
9
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
10
ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
11
शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ
12
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?
13
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
14
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
15
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
16
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
17
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
18
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
19
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
20
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
Daily Top 2Weekly Top 5

"सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे" - संभाजी भिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:26 IST

सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे, त्यामुळं या विषयावर बोलायला नको, अशी टीका संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देआज आपल्या समाजावर दुर्देवाने अभिनेते आणि अभिनेत्र्यांचा प्रभाव आहे. आपला समाज या अभिनेत्यांचा आदर्श घेतो. या नटनट्यांची लायकी काय आहे? त्यांची पात्रता काय? १ अब्ज ३५ कोटी जनता त्यांना आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून स्वीकारतात. याचा अर्थ या देशाचं लवकरच वाटोळं होणार हे निश्चित आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवरून दोन राज्यांतील वाद पेटला असून या वादादरम्यान आता शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उडी मारली आहे. आज आपल्या समाजावर दुर्देवाने अभिनेते आणि अभिनेत्र्यांचा प्रभाव आहे. आपला समाज या अभिनेत्यांचा आदर्श घेतो. या नटनट्यांची लायकी काय आहे? त्यांची पात्रता काय? उंची किती तरीही १ अब्ज ३५ कोटी जनता त्यांना आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून स्वीकारतात. याचा अर्थ या देशाचं लवकरच वाटोळं होणार हे निश्चित आहे. त्याचंच हे निदर्शक आहे. सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे, त्यामुळं या विषयावर बोलायला नको, अशी टीका संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतात आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जून जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका देखील यावेळी भिडे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, ते म्हणाले की, उद्धव ठाकरे व शरद पवार दोन्ही नेते वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने राम मंदिराच्या भूमिपूजनास उपस्थित रहावे. उद्धव ठाकरे यांनी आॅनलाईन पद्धतीने सोहळा करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडली नसती.शिवसेनेचे योगदान महत्वाचे शिवसेना ही हिंदू धर्मरक्षणासाठी आवश्यक आहे. शिवसेनेचे यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जायला हवे. राज्यभरातही दौरा करून ठाकरे यांनी कोरोनाबद्दलची लोकांमधील भीती दूर करावी.

 

राममंदिर भूमिपूजन सोहळा दिवाळी सारखा साजरा करावा कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. सूरक्षित अंतराचा नियम तसेच लॉकडाऊनसारखे प्रकार खच्चीकरण करणारे आहेत. त्यामुळे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSangliसांगली