शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सदाभाऊ खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदारकी रद्द करा : अ‍ॅड. अमित शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:53 IST

यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. 

ठळक मुद्दे एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल.

सांगली - कडकनाथ घोटाळ्याबद्दल आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पत्रकार परिषद घेऊन खालच्या पातळीची भाषा वापरत मंत्री सदाभाऊ खोत यांनी धमकावले आहे. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून मंत्रीपद व आमदारकी रद्द करावी तसेच कडकनाथ घोटाळा अनेक राज्यात पसरला असल्याने त्याबाबत एसआयटी नेमावी अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष  अ‍ॅड. अमित शिंदे यांनी केली. यावेळी प्रहारचे सुनिल सुतार, वंचितचे डॉ. विवेक गुरव, शाकिर तांबोळी, दिग्विजय पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. अमित शिंदे म्हणाले की, कडकनाथ कोंबडी चा घोटाळा हा अनेक राज्यामध्ये पसरला आहे. छत्तीसगड मधील शेतकऱ्यांनी त्याबाबत सांगलीमध्ये पोलीस अधिक्षक यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलन पुकारलेले आहे. याबाबत मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते हे महारयतच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना दमबाजी करत आहेत. त्याबाबतचे विडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनीच गुन्हे दाखल करावेत अशी भूमीका आंदोलनकर्त्यांनी घेतली. आपला संबंध जोडल्यामुळे चिडून जाऊन  मंत्री सदा खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनकर्त्याविरुध्द अतिशय घाणेरडी भाषा वापरली. तुमच्या श्राद्धच जेवण मी जेवणार, सावज टप्यात आल्यावर शिकार करणार, तुमच्या छाताडावर नाचणार अशी असंसदीय भाषा वापरून जाहीररित्या आंदोलनकर्त्यांनी धमक्या दिल्या आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या इतिहासात कोणाही मंत्र्याने इतक्या खालच्या पातळीची भाषा वापरली नाही. या धमकीची दखल घेऊन पोलिसांनी मंत्री सदा खोत यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. आंदोलनकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला मंत्री सदाभाऊ खोत हे जबाबदार असतील. पोलिसांनी २४ तासात ही कारवाई न केल्यास नाईलाजास्तव पोलिसांविरुद्ध न्यायालयात जावे लागेल. तसेच या प्रकाराची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेऊन सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद व आमदारकी रद्द करावी अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच छत्तीसगड, राजस्थान व इतर राज्यातील शेतकऱ्यांची देखील या प्रकरणात फसवणूक झाली असल्याने याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी तसेच या घोटाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान देऊन त्यांना खाद्य व इतर सोइ पुरवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली.या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुभाष पाटील, नामदेव करगणे, प्रा. वासुदेव गुरव, जयंत जाधव, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, अल्ताफ पटेल उपस्थित होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत advocateवकिलSangliसांगलीMLAआमदार