अश्लील चित्रफीतप्रकरणी तरूणास चोप
By Admin | Updated: October 25, 2015 00:39 IST2015-10-25T00:39:08+5:302015-10-25T00:39:08+5:30
मिरजेतील प्रकार : बालिकेस मोबाईलवर दाखवली चित्रफीत

अश्लील चित्रफीतप्रकरणी तरूणास चोप
मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या लहान बालिकेस मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखविणाऱ्या अंकुश रामा शितोळे (वय २२, रा. सुभाषनगर) या रखवालदारास जमावाने चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
विजापूर वेस परिसरात टाकळी रस्त्यावर वीटभट्टी आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराची पाच वर्षाची मुलगी व अन्य मुले तेथे खेळत असताना, अंकुश शितोळे याने आपल्या मोबाईलवर बालिकेस अश्लील चित्रफित दाखविली. बालिकेने आईस हा प्रकार सांगितल्यानंतर वीटभट्टीवरील मजूर व परिसरातील नागरिकांनी याबाबत अंकुश यास जाब विचारला. अंकुशने याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त जमावाने त्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मुलीच्या आईने शहर पोलिसात तक्रार दिली असून, आरोपी अंकुश शितोळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे विजापूर वेस परिसरात खळबळ उडाली होती. (वार्ताहर)