खते, औषधे, बियाणांमध्ये घोटाळे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:11+5:302021-08-14T04:32:11+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागाचे नूतन कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन मोहीम अधिकारी डी.एम. पाटील यांनी स्वागत ...

खते, औषधे, बियाणांमध्ये घोटाळे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा
जिल्हा परिषद कृषी विभागाचे नूतन कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन मोहीम अधिकारी डी.एम. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी कृषी अधिकारी अण्णासाहेब बारवकर, अमोल कोळी, धनाजी थोरात आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे आणि औषधे मिळावे, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने प्रयत्न करावेत. बोगसगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हा परिषदेचे नूतन कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी दिल्या.
जिल्हा परिषद कृषी विभागाचे नूतन कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी शुक्रवारी पदभार घेतला. यावेळी मोहीम अधिकारी डी.एम. पाटील यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विनायक पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, पारदर्शी कारभार करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. खते, औषधे आणि बियाणांमध्ये घोटाळे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, मी तुम्हाला सर्व मदत करण्यास तयार आहे. प्रशासकीय अडचणीही सोडविण्यात येतील.
यावेळी कृषी अधिकारी अण्णासाहेब बारवकर, धनाजी थोरात, आकाराम पवार, अर्जुन खरजे, कैलासकुमार मरकाम, चंद्रकांत माळी, नंदकुमार चव्हाण, विस्तार अधिकारी अमोल कोळी, राहुल माळी, श्रद्धा पवार, मदन यादव, अजित साळुंखे आदींची उपस्थिती होती.