कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:47+5:302021-06-03T04:19:47+5:30
सांगली : कोविड केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करावे ...

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्या
सांगली : कोविड केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करावे व महिलांच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. मानक प्रणालीचे पालन न करणाऱ्या सेंटरवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे. या कक्षात पुरुष सहायकाची नियुक्ती करण्यात येऊ नये. अपवादात्मक परिस्थितीत पुरुष सहायकाची नियुक्ती करण्यात आली असल्यास त्यांनी महिला सहायकासोबतच महिला कक्षेत प्रवेश करावा. कोणत्याही पुरुष कर्मचाऱ्याने महिला सहायकासोबत महिला वॉर्डात दरवाज्यावर नॉक करूनच प्रवेश करावा. महिला कक्षात रूमच्या साफसफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांच्या सेवेसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबराेबरच इतर सुविधाही देण्यात याव्यात. महिला रुग्णाचा मृतदेह दुसरीकडे घेऊन जाताना महिला कर्मचारी सोबत असणे आवश्यक आहे. यासह इतर सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.