पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने घेऊन जा, अन्यथा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:53+5:302021-09-02T04:57:53+5:30
सांगली : जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात बेवारस वाहने पडून आहेत. गुन्ह्यांचा निकाल होऊन वाहने मूळ मालकांना परत देण्याचे आदेशही ...

पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने घेऊन जा, अन्यथा लिलाव
सांगली : जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात बेवारस वाहने पडून आहेत. गुन्ह्यांचा निकाल होऊन वाहने मूळ मालकांना परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पोलीस ठाण्यातील वाहने मूळ मालकांनी घेऊन जावीत, अन्यथा त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
गेडाम यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांखाली वाहने जप्त करण्यात आली होती. यात ८३ दुचाकी, ११ तीनचाकी, १७ चारचाकी, पाच सहाचाकी वाहनांचा समावेश आहे. पोलीस ठाण्याकडे जप्त असलेली ही वाहने मूळ मालकांना परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही वाहनांच्या रजिस्टर नोंदीवरून चेसिस नंबरमधील खाडाखोडीमुळे संबंधित मालक शोधणे शक्य होत नाही. अशा २५ दुचाकी व २ चारचाकी वाहनांचा आतापर्यंत मालकांचा शोध लागला नाही. ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षे पडून राहिल्याने गंजून खराब झाली आहेत. सर्व बेवारस वाहनांची माहिती जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यानुसार मालकांनी कायदेशीर खात्री देऊन वाहने घेऊन जावीत, अन्यथा दोन महिन्यांच्या कालावधीनंतर या वाहनांचा जाहीर लिलाव पार पाडण्यात येईल.