शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 15:32 IST

Hanuman Jayanti Sangli : मारुतीराया...हे कोरोनाचे संकट दूर करावे आता असे साकडे शहरातील हनुमान मंदिरांमधील पुजाऱ्यांनी मंगळवारी घातले. शहरातील मंदिरांमध्ये साधेपणाने बंद दरवाजाआड हनुमान जयंती साधेपणाने साजरी झाली. सलग दोन वर्षे भाविकांना या कार्यक्रमांपासून दूर रहावे लागले.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट दूर कर.. मारुतीराया !पुजाऱ्यांकडून साकडे : सांगलीत हनुमान जयंती साधेपणाने साजरी

सांगली : मारुतीराया...हे कोरोनाचे संकट दूर करावे आता असे साकडे शहरातील हनुमान मंदिरांमधील पुजाऱ्यांनी मंगळवारी घातले. शहरातील मंदिरांमध्ये साधेपणाने बंद दरवाजाआड हनुमान जयंती साधेपणाने साजरी झाली. सलग दोन वर्षे भाविकांना या कार्यक्रमांपासून दूर रहावे लागले.रामनवमी पाठोपाठ हनुमान जयंतीलाही मंदिरांचे दरवाजे लॉकडाऊनमुळे बंद राहिले. शहरातील मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रतनशीनगरजवळी मारुती मंदिर, पंचशीलनगर, लक्ष्मीनगर, माधवनगर याठिकाणच्या मारुती मंदिरातील पुजाऱ्यांनी जयंतीनिमित्त पुजाविधी पार पाडले. पहाटे साडे तीन वाजल्यापासून मंदिरांमध्ये तयारी सुरु होती. गाभारा व मूर्तीला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. रुद्राभिषेक, जन्मकाळ उत्सव, पाळणा, आरती, नैवेद्य अर्पण असे कार्यक्रम पार पडले.सांगलीच्या पंचमुखी मारुती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून पुजाविधी सुरु होती. मोजक्याच पाच लोकांच्या उपस्थितीत येथील कार्यक्रम पार पडले. हनुमान जयंतीनिमित्त पाळणा सजविण्यात आला होता. यावेळी बाबुराव पुजारी, अमोल पुजारी, वामन महिंदरकर, बाळू मुळे, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

अमोल पुजारी म्हणाले की, साधेपणाने जयंती साजरी करतानाच आम्ही मारुती चरणी कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना केली. या संकटामुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे म्हणून प्रार्थना करतानाच सर्व पुजाविधी परंपरेप्रमाणे करण्यात आले.सलग दोन वर्षांपासून रामनवमी व हनुमान जयंतीचे कार्यक्रम रद्द झाले. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीReligious Placesधार्मिक स्थळेSangliसांगली