तासगावात काेराेनाचे नियम मोडल्यास कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:46+5:302021-04-30T04:33:46+5:30

तासगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आदेश प्राप्त झाले असून, तालुक्यात प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ...

Take action if you break Kareena's rules in Tasgaon | तासगावात काेराेनाचे नियम मोडल्यास कारवाई करा

तासगावात काेराेनाचे नियम मोडल्यास कारवाई करा

तासगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आदेश प्राप्त झाले असून, तालुक्यात प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तहसीलदार कल्पना ढवळे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामस्तरीय दक्षता समित्यांसोबत नियमितपणे संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनो प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दक्षता समितीने दिले आहेत. उपाययोजना राबवत असताना कोणताही गट न बघता गावचे हित लक्षात ठेवून नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले. तसेच दक्षता समितीकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नसल्यास दक्षता समितीवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी तहसीलदार ढवळे यांनी दिला.

तालुक्यात जरंडी, राजापूर या ठिकाणी काेराेनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपाययोजनांची पाहणी करून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Take action if you break Kareena's rules in Tasgaon