नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:04+5:302021-05-09T04:27:04+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्त कोरे यांनी टाकळी व बोलवाड येथे दक्षता समितीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य सेवक ...

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा
जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्त कोरे यांनी टाकळी व बोलवाड येथे दक्षता समितीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य सेवक व आशा स्वयंसेवकांच्या अडचणी समजून घेऊन म्हैशाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील आशा स्वयंसेवकांना स्वखर्चाने विमा संरक्षण देणार असल्याचे सांगितले.
टाकळी येथे रुग्णसंख्या वाढत असल्याने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. टाकळीमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, आठ दिवस बँकेचे संपूर्ण आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करून विलगीकरण कक्षाचीही निर्मिती करण्यात आल्याचे ग्रामविस्तार अधिकारी आर. एस. गंगातीरकर यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर, विस्ताराधिकारी सदाशिव मगदूम, पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, सरपंच महेश मोहिते, तलाठी प्रमोद जमदाडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आय. एम. वनखंडे, बजरंग जाधव, मनोज नांद्रेकर, सुनील गुळवणे आदी उपस्थित होते.