तासगाव तालुक्यांतील अवैध धंद्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:31+5:302021-08-15T04:27:31+5:30
निवेदनात म्हंटले आहे की, तासगाव तालुक्यात लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावांमध्ये व तासगाव शहरात अवैध मार्गाने मटका, जुगार, गुटखा, गांजा ...

तासगाव तालुक्यांतील अवैध धंद्यांवर कारवाई करा
निवेदनात म्हंटले आहे की, तासगाव तालुक्यात लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या गावांमध्ये व तासगाव शहरात अवैध मार्गाने मटका, जुगार, गुटखा, गांजा यासह इतर अनेक अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत. तासगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी अवैध व्यवसाय फाेफावले आहेत. याचा महिला, युवती, सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार अवैध व्यवसायात ओढले जात आहेत.
अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून खासगी सावकारकीसह इतर अवैध व्यवसाय फाेफावले आहेत. यातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. पोलीस प्रशासनाने तालुक्यातील सर्व अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा प्रशांत केदार यांनी निवेदनात दिला आहे.
फोटो : १४ तासगाव २
ओळ : तासगाव तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत केदार, रोहित भिसे यांनी पाेलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना निवेदन दिले.